Bigg Boss Marathi 4 Winner Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'आय लव्ह यू बिग बॉस...' म्हणणारा मास्टर माईंड ठरला महाविजेता...

बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील अक्षय केळकरची विजेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: अखेर तो क्षण आला ! १०० दिवसांपूर्वी अर्थात २ ऑक्टोबर रोजी सुरु झालेला हा खेळ कधी अंतिम टप्प्यात आला काही कळलंच नाही. अंतिम टप्प्यात आलेल्या या खेळाला अखेर महाविजेता मिळाला. बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील अक्षय केळकरची विजेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ऑल इज वेल (All Is Well) म्हणत या सीझनचे दार उघडले आणि एकूण १६ स्पर्धकांमध्ये रस्सी खेच सुरु झाली. टॉप ५ मध्ये आलेल्या या स्पर्धकांनी आपल्या खेळाला वेगळे वळण देत फिनालेत धडक मारली.

बिग बॉसच्या चौथ्या सीझनचीच सुरुवातच वादाने झाली होती. एकमेकांमध्ये होत असलेल्या वादामुळे बऱ्याच स्पर्धकांनी नॉमिनेट केले होते. पण त्याची चुक नंतर त्याने माहित पडली. यावरुन स्पर्धक आपल्याला फिनालेमध्ये येण्यासाठी कोणती पातळी ओलांडतील याची माहिती आली. या पर्वात फिनालेतील टॉप स्पर्धकांमध्ये अपुर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने आणि राखी सावंत हे स्पर्धक होते.

बिग बॉसच्या खेळात असलेल्या टॉप ५ मधील तीन स्पर्धकांनी घरातील स्पर्धकांचा निरोप घेतला. त्यातील पहिली स्पर्धक म्हणजे राखी. फिनालेच्या एका टास्कदरम्यान राखी सावंतने घराच्या बाहेर निर्णय घेतला, तर अमृताला मिळालेल्या कमी वोट्समुळे तिला घराबाहेर पडावे लागले होते. तिसरा स्पर्धक म्हणजे, सातारचा बच्चन अर्थात किरण माने. किरण माने पहिल्या दिवसापासून नेहमीच प्रचंड चर्चेत राहायचा. चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे त्याचा प्रवास इथपर्यंत बराच सुखकर झाला होता.

तर, बिग बॉसच्या चौथ्या सीझनची महाविजेता अक्षय केळकर ठरला आहे. तर उपविजेता बिग बॉसच्या खेळातील मास्टर माईंड चेहरा अक्षय केळकर ठरला आहे. स्पर्धकांची ही खेळी पाहता सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रिझर्व्ह बॅकेला धमकी वजा फोन

Manoj Jarange : थोड्या दिवसाचा पाहुणा, कधी जाईन माहित नाही, मनोज जरांगे भावुक

Maharashtra Politics: संविधान बदलण्याचे पाप काँग्रेसने केलं, नितीन गडकरी संतापले

Tube Tunnel : आता भारताशी नडण्याआधी चीन १० वेळा विचार करेल, लेह ते पँगाँग उभारला जाणार आठ किमीचा ट्यूब टनल

Viral Video: चंद्रा गाण्यावर आजपर्यंत खूप नाचले; पण असा डान्स पाहिलाच नसेल, Video बघून कौतुक करताना थकणार नाहीत!

SCROLL FOR NEXT