Bigg Boss Marathi 4:आधी राखी तर आता अमृता, कोण जिंकणार ट्रॉफी चाहते पडले बुचकळ्यात...

अमृताच्या या दमदार खेळीने आणि अचानक अशा या एक्झिटने सर्वांनाच चकीत करुन सोडले हे नक्की.
Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4Saam Tv

Bigg Boss Marathi 4 Grand Finale: अखेर तो क्षण आला! १०० दिवसांपूर्वी अर्थात २ ऑक्टोबर रोजी सुरु झालेला हा खेळ कधी अंतिम टप्प्यात आला काही कळलंच नाही. अंतिम टप्प्यात आलेल्या या खेळाला आता लवकरच महाविजेता मिळणार आहे. ऑल इज वेल (All Is Well) म्हणत या सीझनचे दार उघडले आणि एकूण १६ स्पर्धकांमध्ये रस्सी खेच सुरु झाली. टॉप ५ मध्ये आलेल्या या स्पर्धकांनी आपल्या खेळाला वेगळे वळण देत फिनालेत धडक मारली. ग्रँड फिनालेच्या भागात दुसरं एलिमिनेशन राऊंड पार पडला आहे.

Bigg Boss Marathi 4
Rakhi Sawant And Bigg Boss: ड्रामा क्वीन राखी सावंतची एक्झिट, जाणून घेऊया का होते चर्चा?

बिग बॉसच्या चौथ्या सीझनचीच सुरुवातच वादाने झाली होती. एकमेकांमध्ये होत असलेल्या वादामुळे बऱ्याच स्पर्धकांनी एकमेकांना नॉमिनेट केले होते. पण त्याची चुक नंतर त्यांना माहित पडली. यावरुन स्पर्धक आपल्याला फिनालेमध्ये येण्यासाठी कोणत्याही पातळीला जातील, याचा नेम नाही. या पर्वात फिनालेतील टॉप स्पर्धकांमध्ये अपुर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने आणि राखी सावंत हे स्पर्धक होते. पण या आधी बिग बॉसच्या घरातून राखी सावंत घराबाहेर पडली होती.

Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4: एंटरटेन्मेंट क्विनची एक्झिट, ९ लाखांच्या मोहात राखी पडली अन्...

परंतू बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या अंतिम टप्प्यात आल्यानंतर बिग बॉसच्या एक शेवटचे एलिमिनेशन राऊंड पार पडले. त्या राऊंडमध्ये एक स्पर्धक घराबाहेर अमृता धोंगडे गेली आहे. एक टास्कमुळे राखी सावंतला ग्रँड फिनालेमधून बाहेर पडावे लागले होते, पण आता अमृता धोंगडेला कमी वोट्स मिळाल्यामुळे घराबाहेर पडावे लागले आहे.

अमृता धोंगडे या घरात पहिल्या दिवसापासून खेळत असून तिच्या खेळाला नेहमीच सर्व स्पर्धक नाव ठेवायचे. पण तिच्या या दमदार खेळीने आणि अचानक अशा या एक्झिटने सर्वांनाच चकीत करुन सोडले हे नक्की. यापूर्वी राखीच्या आणि आता अमृताच्या एक्झिटने या दोघींच्याही चाहत्यांना फार मोठा धक्का बसला असून आता कोणता स्पर्धक महाविजेता होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com