Apurva Nemlekar New Film Raavrambha Instagram
मनोरंजन बातम्या

Raavrambha Teaser: शेवंताच्या नव्या चित्रपटाची घोषणा; अपूर्वा साकारणार ‘हे’ ऐतिहासिक पात्र...

बिग बॉस मराठी ४ नंतर अपूर्वा नेमळेकर एका ऐतिहासिक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Chetan Bodke

Apurva Nemlekar New Film: बिग बॉस मराठी ४ फेम अपूर्वा नेमळेकर सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. नुकतीच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. अपूर्वा नेमळेकर ‘रावरंभा’ या चित्रपटात ऐतिहासिक पात्र साकारत आहे.

बिग बॉस मराठीचे ४ पर्व संपल्या नंतर अपूर्वा कोणत्या चित्रपटात दिसणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत माहिती दिली. अपूर्वा ‘रावरंभा’ या मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली आहे.

नुकताच ‘रावरंभा’ चा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून टीझर चाहत्यांना फारच आवडला आहे. चित्रपटात एक अनोखी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनला नुकतीच सुरुवात झाली असून चित्रपटाच्या टीमने नुकताच साताऱ्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा चित्रपट १२ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून चित्रपटात प्रमूख भूमिकेत अपूर्वा नेमळेकरसह शंतनू मोघे, अशोक समर्थ, मोनालिसा बागल हे कलाकार आहेत.

अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस मराठी ४’ या रिॲलिटी शो मध्ये दिसली असून ‘रात्रीस खेळ चाले’ मधून शेवंताच्या रूपाने अवघ्या महाराष्ट्राला भारावून टाकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Cup 2025: महिला टीम इंडियाचा 'कबिर खान', लेकींचं स्वप्न साकार करणारा जादूगार

Maharashtra Live News Update: रोहा-रामराज मार्गे अलिबाग जाणाऱ्या मार्गावरील पूल तुटला

अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला, भ्रष्ट अधिका-यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नाही सोडलं

व्होटी चोरीचा मुद्दा पप्पूपर्यंत पोहचला, राजकारणात आणखी किती पप्पू?

Ritesh Meshram Case: रितेश मेश्राम प्रकरणात मोठी कारवाई, हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ८ पोलिसांचे निलंबन

SCROLL FOR NEXT