Akshay Kelkar Shared BBM 4 Memories Instagram/ @akshaykelkar
मनोरंजन बातम्या

Akshay Kelkar Post: ‘बिग बॉस मराठी ४’च्या आठवणीत अक्षय केळकर पुन्हा रमला; अभिनेत्याची खास पोस्ट चर्चेत

Akshay Kelkar News: ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनचा विजेता आणि अभिनेता अक्षय केळकरने पोस्टमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.

Chetan Bodke

Akshay Kelkar Shared BBM 4 Memories

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनचा विजेता आणि अभिनेता अक्षय केळकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी ८ जानेवारीच्या दिवशी प्रेक्षकांना ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनचा विजेता मिळाला. हा फक्त एक अभिनेता असून तो एक उत्तम निवेदक आणि उत्तम चित्रकार देखील आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्याने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. (Marathi Actor)

अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आठवणी शेअर करताना म्हणाला, "One year to the bigg day of my life आयुष्यातला एक क... मा... ल... क्षण म्हणजे, बिग बॉस ने माझ्या घरातल्या प्रवासाचं, खिलाडू वृत्तीचं केलेलं कौतुक! आणि एका सुंदर क्षणांनी भरलेल्या प्रवासातला विजयाचा तो शेवटचा दिवस... त्याला आज एक वर्ष पूर्ण होतंय! (हे खूप फिल्मी वाटू शकतं, पण एक वर्ष झालंय खरंच वाटत नाही. अजूनही घरात असल्या सारखंच वाटतंय.) मायबाप रसिकांचे मनापासून आभार. हा प्रवास तुमच्यामुळे शक्य झाला. क्रूपासूनने ते सगळ्यांचा मी आभारी आहे. तुम्ही सर्वजण भारी आहात. बिग बॉस आणि मायबाप प्रेक्षक, आय लव्ह यू, मी खरंच फक्त आणि फक्त तुमचाच आहे." (Social Media)

दरम्यान, अक्षयच्या केळकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, आपल्या विशेष बुद्धी चातुर्याने, आणि दमदार खेळीने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनचा विजेता ठरला. सोबतच, ‘बिग बॉस मराठी ४’च्या आधी तो हिंदी मालिकांमध्ये झळकला होता. शिवाय ‘दोन कटिंग’ या वेब फिल्ममध्ये तो पाहायला मिळाला होता. त्यासोबतच अक्षयने ‘ढोलकीच्या तालावर’च्या निवेदनाची जबाबदारीही अक्षयने चांगली पेलली होती. लवकरच अभिनेता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT