Bigg Boss Marathi 4 Latest Update Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: स्नेहलता वसईकर बिग बॉसच्या घरातून बाहेर, घरात आणखी काय नवे बदल होणार याची साऱ्यांनाच चिंता

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये सर्वाधिक मोठा ट्विस्ट आला आहे. जस जसे दिवस पुढे सरकत आहेत, तस तशी नव नवी खेळी दिसून येत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये सर्वाधिक मोठा ट्विस्ट आला आहे. जस जसे दिवस पुढे सरकत आहेत, तस तशी नव नवी खेळी दिसून येत आहे. पहिल्या दिवसापासून सुरुवात झालेल्या भांडणाला आजही तसेच रूप कायम आहे. बिग बॉसचे घर म्हंटल्यावर नेहमीच भांडण, हसणे, मस्ती- धमाल हा प्रकार येतोच.

सध्या तरी बिग बॉसच्या हे सर्वच ट्विस्ट दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची सर्वांनाच धाकधूक आहे. बिग बॉसच्या घरात आतापर्यंत 5 वाईल्ड कार्ड स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यातील दोघं स्पर्धक एका आठवड्यातच घराच्या बाहेर गेले होते. त्यांच्या सर्वांच्या खेळीने घरात मोठे बदल झाले होते.

कोणते नवीन स्पर्धक आले की, सर्व स्पर्धकांच्या खेळात, निर्णय क्षमतेत फार मोठाबदल होताना आपल्याला दिसतो. गेल्या आठवड्यात सर्व स्पर्धकांनी एकूण 5 स्पर्धकांना नॉमिनेट केले होते. त्यात आरोह वेलणकर, अपूर्वा नेमळेकर, स्नेहलता वसईकर, विकास सावंत आणि प्रसाद जावडे यांना नॉमिनेट केले होते. त्यात स्नेहलता वसईकर घराच्या बाहेर गेली असून बाकीचे सर्व स्पर्धक सेफ झाले.

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टनपद हे अक्षयकडे होते. अक्षय आणि प्रसादमध्ये चांगलेच भांडण आपल्याला रंगताना दिसले. त्यांच्यातील वाद हा बराच विकोपाला गेला होता. अक्षयवर त्याच्या विरोधात असणाऱ्या सदस्यांवर नॉमिनेशन करतो असा आरोप सर्व करायचे, हा आरोप त्याच्यावर असल्याने त्याने स्नेहलताला नॉमिनेट केले होते. आणि काल बिग बॉसच्या घरातूनच नेमकी काल स्नेहलता बाहेर गेली आहे. तिच्या जाण्याने घरातील बऱ्याच स्पर्धकांना रडु आवरत नव्हते.

स्नेहलता जवळपास घरात 40 दिवस वाईल्ड कार्डच्या रुपात स्पर्धकांसोबत राहिली. तिच्या जाण्याने कोणाच्या कोणाच्या खेळात काही बदल होतोय का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उरलेल्या दिवसात अजून कोणता मोठा महत्वाचा ट्विस्ट घरात येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT