Bollywood Movie Box Office Collection: दृश्यम २ ची भूरळ प्रेक्षकांवर अजुनही कायम, बाकीच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांची पाठ

२०२२ मध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली आहे, तर काही चित्रपट सपशेल आपटले.
Bollywood movie box office collection
Bollywood movie box office collectionSaam Tv

Bollywood Movie Box Office Collection: २०२२ मध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली आहे, तर काही चित्रपट सपशेल आपटले. नोव्हेंबर महिन्यात असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. तो चित्रपट म्हणजे, 'दृश्यम २'. पण या चित्रपटानंतर प्रदर्शित झालेला भेडिया याने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली नाही.

Bollywood movie box office collection
Bigg Boss Marathi 4: मला तो खूप नकली वाटतोय; प्रसाद जवादेवर सर्व स्पर्धकांनी काढली खुन्नस

'दृष्यम 2' च्या पुढे टिकून राहणे कोणत्याही चित्रपटासाठी खूप कठीण झाले आहे. दरम्यान, वरुण धवनच्या 'भेडिया'ची सुरुवात चांगली झाली होती पण आता तीही मंदावली आहे. बॉलिवूडसाठी हे वर्ष इतके खास नव्हते, परंतु थ्रिलरपटाची जागा घेत बऱ्याच चित्रपटांनी चांगली कमाई करण्याचा प्रयत्न केला.

Bollywood movie box office collection
Sushant Singh Rajput: सुशांतच्या घराला अडीच वर्षांपासून भाडेकरु मिळेना, घरमालकाने शेअर केला घराचा VIDEO, भाडंही सांगितलं

अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. चित्रपटाच्या बक्कळ कमाईमुळे बॉलिवूडला नक्कीच अभिमान वाटला असेल.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 23 व्या दिवशी, मिळालेल्या माहितीनुसार, दृश्यम 2 ने तब्बल 4.65 कोटींची कमाई केली. 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे.

Bollywood movie box office collection
Dilip Kumar: दिलीप कुमारांचा पोस्टर पाहिला अन् कोसळले रडू, सायरा बानोंच्या ह्रदयस्पर्शी व्हिडिओने नेटकरी भावूक

एक आठवड्यानंतर चित्रपटाने सुरुवातीच्या बॉक्स ऑफिसवर कमाई चांगलीच ठेवली आहे. वरुण धवन मुख्य भूमिकेत असलेला 'भेडिया' चित्रपटाने सुरुवातीला समाधानकारक कमाई केली, पण नंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ कधीच दिसली नाही. भेडियाने गेल्या शनिवारी 1.55 कोटींची कमाई केली आहे.

Bollywood movie box office collection
Virat-Anushka: पश्चिमी दिल्लीचा मुलगा-दक्षिण दिल्लीची मुलगी; अनुष्काने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विराटसाठी केलेली पोस्ट चर्चेत

आयुष्मान खुरानाचा 'अ‍ॅन अॅक्शन हिरो'ने पहिल्या दिवसापासून खास कमाई केलीच नाही. या चित्रपटात आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कदाचित त्याच्या चाहत्यांना आवडला नाही. म्हणूनच त्याने चित्रपटाचे इतके खास प्रमोशन केले नव्हते. चित्रपटाने शनिवारी बॉक्स ऑफिसवर खास कमाई केलीच नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com