Meenal Shah SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss' फेम अभिनेत्रीची उंच भरारी; गोव्यात घेतलं आलिशान घर, पाहा Inside Photo

Meenal Shah Buy New House : 'बिग बॉस मराठी 3' ची स्पर्धक मीनल शाहने गोव्यात आलिशान घर घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

यंदा दिवाळीत अनेक कालाकारांनी नवीन गोष्टींची खरेदी केली आहे. कोण घर घेतलं तर कुणी गाडी प्रत्येकजण दिवाळीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. अशात आता अजून एका कलाकाराचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर खरेदी करणे ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र 'बिग बॉस मराठी' फेम कलाकाराने चक्क गोव्याला आलिशान घर खरेदी केले आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून 'बिग बॉस मराठी' फेम मीनल शाह (Meenal Shah) आहे.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मीनल शाहने गोव्याला आलिशान बंगला खरेदी केला आहे. ही गोड बातमी तिने इन्स्टाग्रामवर घराच्या पूजेचे फोटो शेअर करून दिली आहे. तिने गृहप्रवेशाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मीनल शाहने धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर गोव्यातील तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. मीनलने या फोटोंना खूप छान कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "गणपती बाप्पा मोरया!शेवटी आमचं स्वप्न सत्यात उतरलं..."सपने देखने से लेकर उनको पूरा करने तक का सफर" या शब्दात मीनलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मीनल संपूर्ण पोस्टमध्ये आपला प्रवास सांगितला आहे. मीनलच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.

मीनल शाह 'बिग बॉस मराठी 3' मध्ये (Bigg Boss Marathi 3 ) झळकली होती. आपल्या गेमने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. बिग बॉसमुळे मीनलला प्रचंड लोकप्रियता मिळवली. मीनल शाह टॉप ५ मध्ये होती. तसेच मीनल 'रोडीज'मध्येही दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT