Jay Dudhane Expensive Bag Stolen From Car  Instagram
मनोरंजन बातम्या

Jai Dudhane Car Stolen: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याच्या कारमधून झाली चोरी, घटनेविषयी माहिती देताना म्हणाला...

Jai Dudhane News: ‘बिग बॉस मराठी ३’ फेम जय दुधाणेच्या कारमधून महागातली बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे.

Chetan Bodke

Jay Dudhane Expensive Bag Stolen From Car: ‘बिग बॉस मराठी ३’ मधून प्रकाशझोतात आलेला जय दुधाणे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जयची महागातली बॅग त्याच्या कारमधून चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना सोमवारी (१० जुलै) रोजी रात्री घडलेली आहे. चोरट्यांनी कारची काच फोडून बॅग चोरून फरार झाले आहेत. जयने घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. त्याने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे.

जयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत कारची काच फोडलेली दिसून येत आहे. जयने त्याच्या चाहत्यांना त्याची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती त्याने दिली आहे. जय म्हणतो, “मित्रांनो, माझी तब्येत व्यवस्थित असून माझ्या तब्येतीची चौकशी केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या कारची कोणीतरी काच फोडलीय. आणि तिथून माझी महागडी बॅग लंपास केली आहे. तुम्ही तुमची कार पार्क करताना, सावध राहा.” असं जय म्हणाला आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, जयने त्याची कार पार्किंग स्लॉटमध्ये उभी केली होती. कार पार्क करून तो त्याच्या कामासाठी गेला. कामाला गेल्यानंतर चोरट्याने त्याच्या कारची काच फोडून बॅग लंपास केली आहे. या प्रकरणानंतर जयने आपल्या चाहत्यांना कार पार्किंग स्लॉटमध्ये पार्क करताना, सतर्क राहण्याचे आवाहन केले. जयने त्याच्या फोडलेल्या कारचा फोटो शेअर करताना स्टोरीला,‘ग्लास डाऊन’ असं कॅप्शन दिले आहे.

जयने शेअर केलेल्या फोटोमध्ये, त्याच्या कारच्या काचेचा चुराडा झालेला दिसून येत आहे. काचेचे सर्व बारीक बारीक तुकडे कारच्या काही सीटवर आणि सीट खाली पडलेले दिसत आहे.

दरम्यान, सेलिब्रिटींच्या कारमधील महत्वाचे कागदपत्रे, बॅग आणि गाडीची नासधूस करणं ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटींच्या गाडीची तोडफोड केली आहे. निया शर्मा आणि कौशांक अरोरा यांच्यासोबत अनेक हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्यांच्या कारमधून बॅग चोरीला गेल्या आहेत. जयच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘बिग बॉस मराठी ३’ मधून जय ठाकरे चर्चेत आला होता. तो त्या शोचा उपविजेता ठरला आहे. सोबतच तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाकडं दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

पुणे-बेंगळुरू माaर्गावर बसवर दरोडा, बसमधील दरोड्याचा कट कुठे शिजला? हादरवणाारी माहिती समोर

Maharashtra Live News Update: निष्ठावंताना न्याय द्या, पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Tragic Incident: शेकोटीनं घेतला जीव; हॉटेलच्या रुममध्ये ५ जणांचा गुदमरुन मृत्यू

SCROLL FOR NEXT