Shraddha Kapoor-Rajkummar Rao starrer Stree 2 : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस पडला होता. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने हॉरर कॉमेडी या जॉनर नवी ओळख दिली.
अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री चित्रपटाच्या दुसऱ्या भाग कधी प्रदर्शित होणार यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजन जुलैमध्ये चित्रपटाची घोषणा करणार असल्याची
या वर्षी मार्चमध्ये अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजन हे जुलै 2023 मध्ये स्त्री 2 सुरू करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता निर्माते, तसेच स्त्री 2 चे मधील कलाकार, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी अधिकृतपणे 'स्त्री 2' शूट सुरू झाल्याची घोषणा केली आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित, राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजन प्रॉडक्शन टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. (Celebrity)
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी अधिकृत टीझर शेअर केला आहे आणि घोषणा केली की स्त्री 2 चे चित्रीकरण सुरू झाले आहे. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचेही टीझरवरून स्पष्ट झाले आहे. "एक बार फिर चंदेरी में फैला आंतक! स्त्री २ चे चित्रीकरण सुरु होत आहे. 'आ रही है वो- ऑगस्ट २०२४!" व्हिडिओ पाहा.
टीझरच्या सुरुवातीला लाल रंगात भिंतीवर लिहिलेले 'ओ स्त्री कल आना- 2018'. त्यानंतर शब्द बदलतात, "ओ स्त्री, रक्षा करना - 2024." राजकुमारने टीझर शेअर करताच, भूमी पेडणेकरने एक्सायटेड होत कमेंट केली आहे, "चित्रपटासाठी वाट पाहू शकत नाही मित्रांनो." दरम्यान, हुमा कुरेशीने त्याच्या पोस्टवर फायर इमोजी टाकत कमेंट केल्या आहेत.
पिंकविलाच्या वृत्तानुसार स्त्री 2 मध्ये वरुण धवन देखील खास भूमिका साकारणार आहे. "दोन लीड्स व्यतिरिक्त, स्त्री 2 मध्ये वरुण धवनची भेडियाच्या भूमिकेत देखील खास भूमिका असेल. स्त्री 2 हा पहिला चित्रपट असेल जिथे हॉरर कॉमेडी विश्वातील पात्रे एकमेकांच्या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.