Irina Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Irina Dance Video: गणेशोत्सव मिरवणुकीत साडी नेसून इरिनाने केला बेभान डान्स, नृत्य पाहून तुम्हीही कराल कौतुक

Bigg Boss Fame Irina Dance On Ganpati Miravnuk: सोशल मीडियावर इरिनाचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत इरिनाने ठेका धरला आहे.

Manasvi Choudhary

गणेशोत्सवनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. लाडक्या गणरायाचं आगमन सर्वत्र मोठ्या थाटामाटात झालं. अनेक सेलिब्रिटीसह घरोघरी बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. अशातच सोशल मीडियावर इरिनाचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत इरिनाने ठेका धरला आहे.

इरिनाने पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी बाप्पाच्या मिरवणुकीत इरिनाने मराठमोळ्या अंदाजात डान्स केला आहे. अत्यंत मनमोहक सौंदर्यासह इरिनाच्या डान्स स्टेप्सने लक्ष वेधून घेतले आहे. पारंपारिक लूकमध्ये इरिनाने खास साडी परिधान केली आहे. साडीवर गोल्डन ज्वेलरी परिधान करत इरिनाने केसांची स्टाईल केली आहे.

सोशल मीडियावर इरिनाच्या डान्सचं सर्वत्र कौतुक होत आहे. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत,'खरं तर इरिना महाराष्ट्रात जन्माला यायला पाहिजे होती, चुकून रशियाला गेली' असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, 'बाहेरच्या देशातील असूनही भारतीय देशातील संस्कृती तू जपतेस खरंच तुला मानले...' 'अगंभर कपडे, ही आपली संस्कृती. वा छान वाटलं' अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोण आहे इरिना?

इरिना ही बिग बॉस मराठी स्पर्धक आहे. सध्या बिग बॉस मराठी ५ चा सातवा आठवडा सुरू आहे. यामध्ये अभिनेत्री, इनफ्ल्युएंसर, ब्लॉगर, कंटेन्टर आणि परदेशी गर्ल इरिनाचा सहभाग आहे. यातील काही स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. यात इरिनाचा देखील समावेश आहे. घराबाहेर आल्यानंतर देखील इरिनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मूळची रशियन इरिनाचं मराठी संस्कृतीवर विशेष प्रेम आहे. अनेकदा तिचे मराठी भाषेतील व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT