Amruta Deshmukh-Prasad Jawade Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amruta Deshmukh-Prasad Jawade Wedding :'अमृतामय जाहलो'; प्रसाद जवादेच्या हातावर रंगली अमृताच्या नावाची मेंहदी

Amruta Deshmukh-Prasad Jawade: 'बिग बॉस मराठी ४' फेम अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amruta Deshmukh-Prasad Jawade Share Photo Of Mehndi Ceremony:

'बिग बॉस मराठी ४' फेम अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे. लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अमृताने त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. नुकताच अमृता-प्रसादचा मेंहदी समारंभ पार पडला.

अमृता देशमुख आणि प्रसादने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. तर आता त्यांच्या लग्नाचे विधींना सुरुवात झाली आहे. अमृता प्रसादच्या लग्नाचा मेंहदी समारंभ काल पार पडला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमृता आणि प्रसादने मेंहदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अमृताने मेंहदीच्या कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचा सुंदर लेंहगा परिधान केला होता. त्यावर तिने गुलाबी, जांभळा आणि पांढऱ्या रंगाची फ्लॉवर ज्वेलरी घातली होती. अमृता या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तर प्रसादने पांढऱ्या रंगाचा कुर्ता त्यावर हिरव्या रंगाचे जॅकेट घातले होते. दोघांची जोडी खूप छान दिसत होती.

यावेळी प्रसाद आणि अमृताने एकमेकांच्या नावाची मेंहदी हातावर काढली आहे. प्रसादने हातावर 'अमृतामय जाहलो' असं लिहलं आहे. तर अमृताने बिग बॉस स्टाईलची मेंहदी हातावर काढली आहे. या दोघांचा बिग बॉसच्या घरातील हातात चावी घेतलेला फोटो हुबेहुब हातावर मेंहदीच्या स्वरुपात काढला आहे.

अमृताने फोटो शेअर करत 'सोंदर्याची परंपरा..मेंहदी. माझ्या मेंहदीसाठी ४ तास लागले'. असं कॅप्शन दिले आहे. प्रसाद अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याआधी अमृताने तिच्या ग्रहमख आणि केळवणाचे फोटो शेअर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जांभूळवाडी तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक, NCP शरद पवार गटाला झटका; बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT