Ridhima Pandit SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ridhima Pandit : बिग बॉस फेम अभिनेत्रीनं घेतला मोठा निर्णय; मृत्यूनंतर करणार नेत्रदान, पाहा PHOTOS

Ridhima Pandit Eye Donation : बिग बॉस फेम अभिनेत्री रिद्धिमा पंडितने वाढदिवसाला मोठा निर्णय घेतला आहे. ती मृत्यूनंतर नेत्रदान करणार आहे.

Shreya Maskar

टिव्ही इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री रिद्धिमा पंडितने (Ridhima Pandit) अभिनयाच्या जोरावर लोकप्रियता मिळवली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. ती कायम इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. कालच (25 जून) रिद्धिमा पंडितचा वाढदिवस झाला. काल रिद्धिमा 35 वर्षांची झाली आहे. आपल्या 35व्या वाढदिवसाला मोठा निर्णय घेतला आहे. याची खास पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे.

अभिनेत्री रिद्धिमा पंडितने मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या पश्चात तिचे डोळे गरजू व्यक्तीला दान करण्यात येणार आहे. यासंबंधित तिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यात आय डोनर कार्ड आणि सर्टिफिकेट दिसत आहे. या फोटोंना तिने खूपच खास कॅप्शन दिलं आहे. रिद्धिमाच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून भरपूर प्रेमाचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रिद्धिमा पंडित पोस्ट

"मी आतापर्यंत केलेल्या सर्व स्वाक्षऱ्यांपैकी, मला सर्वात जास्त अभिमान अवयवदान कार्डवर केलेल्या स्वाक्षरीचा आहे. आज वाढदिवसानिमित्त मी एक छोटेसे पाऊल उचलले आहे. मी माझे डोळे दान करण्याचे वचन दिले आहे. जे एक दिवस दुसऱ्याचे जग उजळवू शकते. दृष्टी ही एक देणगी आहे आणि ती माझ्यानंतरही टिकू शकते हा विचार नम्र आणि आशादायक आहे. मला खरोखर विश्वास आहे की अवयव दान ही केवळ वैयक्तिक निवड नाही. ती एक जबाबदारी आहे जी आपण सर्वजण मानव म्हणून सामायिक करतो. तुम्ही सुद्धा एखाद्याला पुन्हा सूर्योदय पाहण्याचे कारण व्हा."

वर्कफ्रंट

रिद्धिमा पंडितने आजवर अनेक मालिकां आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिला 'बहू हमारी रजनीकांत' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिने 'बिग बॉस ओटीटी', 'खतरा खतरा' मध्ये देखील झळकली होती. तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Flag History: तिरंग्याच्या इतिहासात दडलेली १० महत्त्वाचे तथ्य तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

PM Awas Yojana : घरकुलाचं काम झालं, पण पैसे द्यायला सरकारी अधिकाऱ्याची टाळाटाळ, 20 हजार रुपयांची मागितली लाच

SCROLL FOR NEXT