Gauahar Khan Welcomes Second Baby SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gauahar Khan Welcomes Second Baby : 'बिग बॉस' विजेत्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला, अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म

Gauahar Khan Blessed With Baby Boy : प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खानने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. गौहर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे.

गौहर खान 'बिग बॉस 7'ची विजेता ठरली.

गौहरने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

'बिग बॉस 7'ची विजेता गौहर खानने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गौहरच्या (Gauahar Khan) घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. गौहर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. यासंदर्भात खास पोस्ट तिचा नवरा जैद दरबारने केली आहे. गौहर खान आणि जैद दरबार आई-बाबा झाले असून गौहरने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

गौहर खान आणि जैद दरबारला (Zaid Darbar ) 1 सप्टेंबरला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. जैद दरबारच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गौहर खान आणि जैद दरबार हे मनोरंजनसृष्टीतील क्युट कपल आहे. गौहर खानने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आपल्या आयुष्याचे अपडेट ती चाहत्यांसोबत येथे शेअर करते.

लग्नगाठ कधी बांधली?

गौहर खान आणि जैद दरबार यांनी डिसेंबर 2020मध्ये लग्न केले. त्यानंतर 2023 मध्ये गौहरने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. गौहरच्या घरी मुलाचे स्वागत करण्यात आले. गौहर-जैदच्या मुलाचे नाव जेहान आहे. आता त्यांना 2025 मध्ये दुसरा मुलगा झाला आहे.

बिग बॉस

अभिनेत्री गौहर खानही 'बिग बॉस 7'ची विजेता ठरली. तिने आपल्या गेमने प्रेक्षकांची मने जिंकली. आता जैद दरबारचा भाऊ अवेज दरबार आणि त्याची गर्लफ्रेंड नगमा मिरजकर देखील 'बिग बॉस 19'मध्ये झळकत आहे. त्यांनी बिग बॉसमध्ये कपल एन्ट्री घेतली आहे. गौहर खान आणि जैद दरबार त्यांना भक्कम पाठिंबा देताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT