Bigg Boss 20 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा भडका; सदस्यांचा एकमेकांवर पलटवार, ६ जणांवर टांगती तलवार

Bigg Boss 20 Nomination :'बिग बॉस २०'च्या घरात या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी ६ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. कोणाचा पत्ता कट होणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस २०'च्या घरात नॉमिनेशन टास्क पार

६ सदस्य झाले नॉमिनेट

घरच्यांनी एकमेकांनाच केलं टार्गेट

'बिग बॉस २०'च्या घरातून या आठवड्यात आसिफ खान घराबाहेर गेला. सलमान खानने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. घरातील सदस्यांच्या नात्यांची समीकरणे आता बदलताना दिसत आहेत. त्यामुळे खेळ पाहण्याची रंगत वाढतच आहे. घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. या आठवड्याची सुरुवात माही विज आणि कनिका मान यांच्यातील भांडणाने होते. त्यानंतर, माही विजशी बोलल्यामुळे आम्रपाली दुबे आणि यंग डीएसए लव्ह गिलवर रागावतात.

कोण झाले नॉमिनेट?

या आठवड्यात चेन नॉमिनेशन टास्क पार पडवा, ज्यात एक स्पर्धक दुसऱ्याला नॉमिनेट करतो आणि मग दुसरा स्पर्धक तिसऱ्याला नॉमिनेट करतो. बिग बॉस कॅप्टन कनिकाला विचारताक की, ती सर्वात आधी कोणत्या स्पर्धकाला नॉमिनेट करेल? तेव्हा ती माहीचे नाव घेते. कनिका म्हणते की, माही विश्वासाला पात्र नाही. सर्वात आधी माही विज नॉमिनेट होते आणि त्यानंतर माही अम्रपाली दुबेला नॉमिनेट करते. माही म्हणते की, त्यांच्यातील मतभेद मिटत नाहीत आणि त्या कधीही मैत्रिणी होऊ शकणार नाहीत. त्यानंतर अम्रपाली अरिशफा खानला नॉमिनेट करते. अरिशफा स्काउटला नॉमिनेट करते. त्यानंतर स्काउट उदिती सिंगला नॉमिनेट करतो. त्यानंतर उदिती मनीषला नॉमिनेट करते.

या आठवड्यात एकूण सहा सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होतात. यात माही, अम्रपाली, अरिशफा, स्काउट, उदिती आणि मनीष यांचा सहभाग आहे. आता पुढच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येणारे एपिसोड खूपच रंजक ठरणार आहे. 'वीकेंड का वार'ही दिवाळी स्पेशल पाहायला मिळेल.

माही विजनंतर कनिका मान घराची नवीन कॅप्टन बनली आहे. 'बिग बॉस' सीझन २० दररोज रात्री ९:०० वाजता जिओ-हॉटस्टार (JioHotstar) वर स्ट्रीम होतो आणि रात्री १०:३० वाजता कलर्स टीव्ही (Colors TV) वर प्रसारित होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : श्वास घेताना छातीत वेदना होत असल्याने शरद पवार यांच्यावर उपचार सुरू

EPFO 3.O: . नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF चे पैसे काढण्याची पद्धत बदलणार, EPFO चा नवा प्लॅन

ED raid : राजकारणात खळबळ! पहाटे ५ वाजताच माजी मंत्र्यांच्या घरावर ED ची धाड, वकिलांचा गंभीर आरोप

Pune Metro 3 : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो लाईन-३ चं आज लोकार्पण, कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?

पार्थ पवारांविरोधात राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा स्फोट? सुनेत्रा पवारांसमोरच आमदारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

SCROLL FOR NEXT