Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घराला मिळाला नवा कॅप्टन; कोण असेल निशाण्यावर? सदस्यांची उडणार झोप

BB 20 - New captain : 'बिग बॉस २०' च्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा पाहायला मिळाला. माही विजनंतर घराला नवा कॅप्टन मिळाला आहे. आता घरात नवा खेळ रंगताना दिसणार आहे.
BB 20 - New captain
Bigg Boss 20 SAAM TV
Published On: 
Summary

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान स्काउटला चांगलाच सुनावतो.

घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला

या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट

'बिग बॉस २०' हा शो दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होत जात आहे. आज घरात 'वीकेंड का वार' रंगणार आहे. सलमान खानने स्काउटला चांगलेच फटकारले आहे. शोबद्दल सतत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. जसा शो पुढे सरकत आहे, तशी स्पर्धा अधिकच मनोरंजक होत जात आहे. माही विजनंतर घराला नवीन कॅप्टन भेटला आहे.

नवा कॅप्टन कोण?

'बिग बॉस २०'च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये भांडणे, मतभेद पाहायला मिळाले. टास्कदरम्यान, अरिशफा खान, आसिफ, स्काउट आणि कनिका यांच्यासह अनेक स्पर्धकांनी आपली ताकद दाखवली. मात्र, कनिका मानने कॅप्टन्सी जिंकली. माही विजनंतर कनिका मान घराची नवीन कॅप्टन बनली आहे.

आता कनिका मान घरातील सदस्यांसोबत हिशोब चुकता करताना दिसत आहे. कनिका कसे घर चालवणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. गेल्या आठवड्यात 'वीकेंड का वार' रोहित शेट्टीने होस्ट केला. ज्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज पुन्हा भाईजान 'वीकेंड का वार' गाजवताना दिसणार आहे.

कोणते सदस्य झाले नॉमिनेट?

या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात लव्ह गिल, स्काउट, आसिफ खान, कनिका मान, गुल्लू, आम्रपाली दुबे यांचा समावेश आहे. आता या आठवड्यात 'बिग बॉस २०'च्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

BB 20 - New captain
Famous Actress Death : सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

'बिग बॉस २०' च्या घरात आता १२ स्पर्धक ट्रॉफीसाठी स्पर्धा करताना दिसत आहेत. या यादीत आम्रपाली दुबे, आसिफ खान, अरिशफा खान, कनिका मान, लव गिल, माही विज, मनीष गोयल, काझी तौकीर, स्काउटओपी (तन्मय सिंग), उदिती सिंग, युंग डीएसए आणि गुल्लू (कुशाल तन्वर) यांचा समावेश आहे. रोहेद खान, ईशा रिखी, रीती तिवारी, अमन गांधी , नकुल ढुल, मेरी कोम हे सदस्य घरातून बाहेर पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.