Bigg Boss 20 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'चं आतापर्यंतचं सर्वात शॉकिंग एलिमिनेशन; 'हा' स्पर्धक घराबाहेर,चाहत्यांना मोठा धक्का

Bigg Boss 20 Eviction : बिग बॉस 20 मध्ये यंदाच्या सीझनमधील धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. संपूर्ण सीझनमध्ये वाद, भांडणं आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिलेल्या स्पर्धकाची घरातून एक्झिट होणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 20'च्या घरात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. या आठवड्याच्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये एक लोकप्रिय स्पर्धक घराचा निरोप घेणार आहे. संपूर्ण सीझनमध्ये चर्चेत राहिलेल्या या स्पर्धकाच्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धकाचा खेळातील प्रभाव पाहता तिचे एवढ्या लवकर बाहेर पडणे अनेकांसाठी अनपेक्षित ठरले आहे.

सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेनुसार आणि BBTAK च्या रिपोर्टनुसार 'बिग बॉस 20' च्या घरातून या आठवड्यात अभिनेत्री लव्ह गिलचा प्रवास संपणार आहे. मात्र अद्याप 'बिग बॉस 20'ने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. याची माहिती आज (रविवारी) 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान देईल. तसेच सोशल मीडियावर देखील या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी लव्ह गिलचे नाव चर्चेत आहे.

कोणते स्पर्धक झाले नॉमिनेट?

'बिग बॉस 20' च्या घरात या आठवड्यात लव्ह गिलसोबत गुल्लू, कनिका मान, माही विज, आम्रपाली दुबे, स्काऊट ओपी आणि काझी तौकीर हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. लव्ह गिल घरातील खेळ, इतर सदस्यांसोबतचे संबंध आणि सतत चर्चेत राहणारी तिची भूमिका यामुळे ती या सीझनमधील महत्त्वाच्या स्पर्धकांपैकी एक मानली जात होती. लव्ह गिलच्या एलिमिनेशनच्या चर्चेमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बिग बॉसच्या घरात लव्ह गिलने सुरुवातीपासूनच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तिची स्पष्ट मते मांडण्याची पद्धत, इतर स्पर्धकांसोबत होणारे वाद आणि आक्रमक भूमिका यामुळे ती अनेकदा चर्चेचा विषय ठरली.घरातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तिचे इतर सदस्यांसोबत खटके उडाले. अनेकदा तिचे वादविवाद मोठ्या भांडणांमध्ये बदलले. तिची वक्तव्ये आणि काही कृतींमुळेही घरात तसेच सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे बिग बॉसच्या संपूर्ण प्रवासात लव्ह गिल ही प्रेक्षकांच्या नजरेत राहिली.लव्ह गिलच्या अचानक झालेल्या एक्झिटनंतर आता बिग बॉसच्या घरातील वातावरण कसे बदलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या ‘उपसभापती’ पॅनल मध्ये निवड

India Forts : डोंगरापासून वाळवंटापर्यंत...; भारतातील 'हे' ५ भव्य किल्ले पाहून थक्क व्हाल

Weather Update: विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका, कोणत्या जिल्ह्यात कसं राहिल हवामान?

Sunday Horoscope : नात्यांमधला गोडवा वाढेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा आजचे राशीभविष्य

गोवा जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील 5 नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT