Bigg Boss 20 meta ai
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातून पहिला स्पर्धक बाहेर; रोहेद खानच्या चाहत्यांना धक्का

Bigg Boss 20 Elimination: बिग बॉस २० मधून रोहेद खानचा पहिला एलिमिनेशनमध्ये पत्ता कट झाला. कमी सहभागामुळे त्याच्यावर टीका झाली होती. दरम्यान, अमन गांधी आणि अरिश्फा खान यांचीही नावे चर्चेत आली.

Sakshi Sunil Jadhav

सध्या ‘बिग बॉस 20’ ची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खान हा शो होस्ट करत आहे. ६ सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर सुरू झालेल्या या सीझनमध्ये टीव्ही, संगीत, क्रीडा, सोशल मिडिया आणि रॅपींग क्षेत्रातल्या १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. शो सुरू झाल्यानंतर काही दिवसातच घरातलं पहिलं एलिमिनेशन झालं असून, रोहेद खान (Rohed Khan) याला घराबाहेर रस्सा दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रोहेद खान शोमध्ये फारसा सक्रिय दिसत नव्हता. टास्क असो किंवा घरातले दैनंदिन काम, त्याचा सहभाग तुलनेने कमी असल्याचं पाहायला मिळालं. याच मुद्द्यावरून वीकेंड का वारमध्ये सलमान खानने रोहेदला सुनावलं होतं. शोमध्ये त्याचा गेम ठळकपणे दिसत नसल्याचं सलमानने त्याला सांगितलं होतं.

दरम्यान, काही टास्कमध्ये कमी सहभाग आणि शोमध्ये सक्रिय न दिसल्यामुळे रोहेदला इतर स्पर्धकांकडूनही टीकेचा सामना करावा लागला. शिक्षा म्हणून आसिफ खान, तन्मय सिंह उर्फ ScoutOP आणि रोहेद खान यांना थेट नॉमिनेट करण्यात आलं होतं. अखेर या तिघांपैकी रोहेद खानला घराबाहेर जावं लागलं.

घरातील ‘फेक सदस्य’ कोण?

बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी एक मजेदार क्विझही घेतली. यामध्ये घरातला सर्वात ‘फेक’ सदस्य कोण, ‘क्राय बेबी’ म्हणजेच सतत रडणारा सदस्य कोण आणि ‘बुली गँग’मध्ये कोणाचा समावेश होतो, असे प्रश्न विचारण्यात आले. ‘फेक सदस्य’ म्हणून अमन गांधीचं नाव घेण्यात आलं, तर ‘क्राय बेबी’ म्हणून अरिश्फा खानचं नाव समोर आलं. मात्र ‘बुली गँग’मध्ये कोणाचं नाव येतं, हे पुढील एपिसोडमध्ये स्पष्ट होणार आहे.

या सीझनमध्ये मेरी कोम, माही विज, कनिका मान, आम्रपाली दुबे, ईशा रिखी, खुशी दुबे, अरिश्फा खान, कुशल तंवर उर्फ गुल्लू, तन्मय सिंह उर्फ ScoutOP, रॅपर यंग DSA, आसिफ खान, फैजल खान, काजी तौकीर, अमन गांधी, उदिती सिंह आणि रीती तिवारी हे १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. दरम्यान, गुल्लू हा घराचा दुसरा कॅप्टन बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Cardamom for Diabetes: 1 वेलचीमुळे शुगर लेव्हल होऊ शकते कमी, डायबिटीजच्या रुग्णांनी अशा पद्धतीने करा सेवन!

दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांचा काजू-बदामांवर ताव, 'त्या' व्हिडिओने महाराष्ट्रात खळबळ, शिरसाट म्हणाले...

तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

SCROLL FOR NEXT