Bigg Boss 20  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : सलमान खानच्या 'बिग बॉस'मध्ये मोठा ट्विस्ट! 'हा' सदस्य घराबाहेर, टॉप १० मध्ये कोणाला मिळाली जागा?

Bigg Boss 20 Elimination : बिग बॉसला टॉप १० स्पर्धक मिळाले आहेत. घरातील एका सदस्याचा प्रवास थांबला आहे. सलमान खानचा यंदाचा 'वीकेंड का वार' खूप गाजला. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस २०'च्या घरात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एलिमिनेशनमुळे एका स्पर्धकाचा प्रवास संपला असून, आता घराला टॉप १० स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत बिग बॉसच्या घरातील स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. कोणाचा खेळ ठरला भारी आणि कोणाला घराबाहेर पडावे लागले, जाणून घेऊया. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने अनेक स्पर्धकांची कान उघडणी केली तर काहींचे कौतुकही केले. बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवसाला नात्यांचे समीकरण बदलताना दिसत आहे. या आठवड्यात कोणाचा पत्ता कट झाला, जाणून घेऊयात.

बिग बॉसच्या घरातून कोणाचा पत्ता कट?

'वीकेंड का वार'मध्ये बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन पार पडले. वाइल्डकार्ड स्पर्धक अभिनेता मनीष गोयलने घराला रामराम ठोकला. मनीष गोयलचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. मनीष गोयलने 'बिग बॉस 20' च्या घरात वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. मनीष गोयल आपल्या तब्येतीमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे, ज्यासाठी अभिनेत्याला आराम घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मनीष गोयलला बिग बॉसच्या घरातील गेम प्रेक्षकांना खूप आवडला, त्यामुळे अभिनेता घरातून बाहेर गेल्यामुळे चाहते नाराज आहेत.

'बिग बॉस २०' मधील ८ स्पर्धकांचे एलिमिनेशन

  1. रोहीद खान

  2. इशा रिखी

  3. रिती तिवारी

  4. नकुल धुळ

  5. अमन गांधी

  6. मेरी कोम

  7. आसिफ खान

  8. मनीष गोयल

'बिग बॉस २०' चे टॉप १० स्पर्धक

  1. काझी तौकीर

  2. आम्रपाली दुबे

  3. अरिशफा खान

  4. कनिका मान

  5. कुशल तंवर (गुल्लू)

  6. हर्ष विजय मचारे (यंग डीएसए)

  7. तन्मय सिंग (स्काउट ओपी)

  8. लव गिल

  9. उदिती सिंग

  10. माही विज

'बिग बॉस २०' चा हा मजेशीर खेळ कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता प्रसारित होतो आणि जिओ-हॉटस्टारवर रात्री ९:०० वाजता स्ट्रीम होतो. 'बिग बॉस २०'च्या ट्रॉफीसाठी सदस्यांमध्ये ताण आणखी वाढताना दिसणार आहे. कोण बाजी मारणार हे काही दिवसांतच समोर येईल. मनीष गोयलच्या घराबाहेर जाण्याने घरातील अनेक सदस्यांना वाईट वाटले आहे. आता घरात नवीन काय धमाका होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : MSF जवानांवरील वाढत्या हल्ल्यांची गंभीर दखल; हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, पण मागे हटता येईना! मंत्र्यांच्या कबुलीने खळबळ

Tilak Varma: तिलक वर्माच्या शतकानंतरही पराभवाची नामुष्की का ओढवली? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं, वाचा!

Winter Ladoo Recipe : ना साखर, ना पाक करण्याची कटकट! हिवाळ्यात फक्त १० मिनिटांत बनवा खजूर-ड्रायफ्रूट्सचे लाडू

Accident: खासदाराच्या ताफ्यातील वाहनाला भीषण अपघात, कार खड्ड्यात कोसळली; ५ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT