Bigg Boss 20 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात महायुद्ध; आरिशफावर भडकला स्काउट, आम्रपाली अन् माहीमध्ये कडाक्याचे भांडण | VIDEO

Bigg Boss 20 - Captain Task Drama : 'बिग बॉस २०'च्या दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क दरम्यान घरात तुफान राडा पाहायला मिळाला. आरिशफावर स्काउट चांगलाच भडकला. तर दुसरीकडे आम्रपाली आणि माहीमध्येही वाद झाला.

Shreya Maskar

आरिशफावर भडकला तन्मय सिंग

आम्रपाली आणि माहीमध्येही भांडणे

दुसऱ्या कॅप्टन्सी टास्कमध्ये घरात तुफान राडा

सलमान खान होस्ट करत असलेला शो 'बिग बॉस २०' सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरात रोज एक नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात कॅप्टन यंग डीएसए बनला. आता घरात दुसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी युद्ध पाहायला मिळत आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क रंगला. ज्यात आरिशफा- स्काउट (तन्मय सिंग) आणि आम्रपाली दुबे-माही वीज यांच्यात तुफान राडा पाहायला मिळाला.

आरिशफावर भडकला स्काउट

बिग बॉस दुसऱ्या दिवशी सकाळी कॅप्टनसी टास्कची घोषणा करतात. बिग बॉस टास्क समजावून सांगतात की, पुरुष स्पर्धक एका पांढऱ्या खोलीत पांढरे कपडे घालून उभे राहतील, तर महिला स्पर्धक त्यांच्यावर रंगांनी निशाणा साधतील. ज्या स्पर्धकावर सर्वात जास्त रंग उडेल, तो कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडणार होता.या टास्कदरम्यान, स्काउट ओपी, काझी तौकीर, यंग डीएसए आणि रोहीद खान हे बाहेर पडले. या टास्कदरम्यान अरिशफा आणि स्काउट यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यांनी एकमेकांवर खूप रंग फेकला आणि वैयक्तिक टीकाही केली.अरिशफा स्काउटवर रंग फेकते, ज्यामुळे स्काउटला राग येतो. स्काउट अरिशफाला म्हणते, "मी तुला इथेच फेकेन." यावर अरिशफा रागाने प्रतिक्रिया देते, ज्यामुळे स्काउट आणि अरिशफा यांच्यात जोरदार वाद होतो.

आम्रपाली दुबे - माही विज यांच्यात वाद

जेवणावरून स्वयंपाकघरात सुरू झालेल्या वादाचे रूपांतर वैयक्तिक वादात झाले. चिकनमध्ये बटाटे घालण्यावरून आम्रपाली दुबे आणि माही विज यांच्यात भांडणे होतात. प्रकरण इतके वाढले की माहीने आम्रपालीसाठी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यानंतर माही आणि आम्रपाली दुबे दोघीही भावूक होऊन रडताना दिसल्या. घरातील काही सदस्य आम्रपालीची बाजू घेत होते तर काही सदस्य माहीच्या बाजूने होते.

दुसऱ्या आठवड्यात कोण नॉमिनेट?

'वीकेंड का वार'मध्येच दुसऱ्या आठवड्यासाठी तीन सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले. या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये आसिफ खान, रोहेद खान आणि तन्मय सिंग यांचा समावेश आहे. हे तिघे टास्क दरम्यान नॉमिनेशनवर चर्चा करत होते, त्यामुळे बिग बॉसने संपूर्ण नॉमिनेशन टास्क रद्द करून त्यांना थेट शिक्षा दिली. कॅप्टन यंग डीएसए देखील या चर्चेत सहभागी होता, पण कॅप्टन असल्यामुळे त्याला वगळण्यात आले.'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT