Bigg Boss 20  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20 : पहिल्याच दिवशी मोठा गेम! 'बिग बॉस २०' मधील स्पर्धकाला थेट बॉलिवूडमधून सपोर्ट; अभिनेत्रीच्या 'त्या' VIDEO मुळे खळबळ

Bollywood Actress Support BB 20 Contestant : 'बिग बॉस २०'मधील एका स्पर्धकाला बॉलिवूडच्या देसी गर्लचा खंबीर पाठिंबा मिळाला आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करून यासंबंधित माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉसच्या स्पर्धकाला बॉलिवूडचा पाठिंबा

बॉलिवूडच्या देसी गर्लने शेअर केला खास व्हिडीओ

घरातील इतर सदस्यांना दिली चेतावणी

प्रेक्षकांचा लोकप्रिय शो 'बिग बॉस' पुन्हा एकदा मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. यंदा 'बिग बॉस' मध्ये प्रत्येक गोष्ट डबल होताना दिसणार आहे. 'बिग बॉस २०' ची थीम ‘तथास-टू’ आहे. 'बिग बॉस 20' मध्ये 'अतिरिक्त जीवन दान' ट्विस्ट देखील असेल, जे स्पर्धकांना गेम दरम्यान अतिरिक्त जीवनरेखा देईल. बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धकांनी दमदार एन्ट्री घेतली आहे. शोच्या पहिल्याच दिवशी घरातील एका सदस्याला बॉलिवूड स्टारचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे.

'बिग बॉस 20' मध्ये बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमने एन्ट्री केली आहे. मेरी कोमला बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने पाठिंबा दिला आहे. मेरी कोमसाठी प्रियंकाने खास एक संदेश पाठवला आहे. ज्याचा व्हिडीओ 'बिग बॉस'च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात प्रियंका मेरी कोमला शुभेच्छा देताना आणि इतर स्पर्धकांना चेतावणी देताना दिसत आहे.

२०१४ मध्ये आलेल्या मेरी कोमच्या बायोपिकमध्ये प्रियांकाने बॉक्सरची भूमिका साकारली होती. प्रियंका म्हणाली की, "तू बिग बॉसच्या घरात प्रवेश करत आहेस आणि मला माहित आहे की तू किती धाडसी आहेस आणि प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी किती दृढनिश्चयी आहेस. सर्व स्पर्धकांसाठी माझा एक छोटासा इशारा आहे. जर तुम्हाला मेरीसमोर टिकायचे असेल, तर एका लांब शर्यतीसाठी तयार रहा. तिचा नॉकआऊट खूप गंभीर असतो. मेरी, तू जशी आहेस तशीच रहा. मोकळ्या मनाने खेळ... मी तिचा प्रवास पाहण्यासाठी उत्सुक आहे. खूप खूप प्रेम आणि मी तुला नेहमीच प्रोत्साहन देत राहीन..."

बॉक्सिंग रिंगमध्ये अनेक वर्षे स्पर्धा केल्यानंतर, आता 'बिग बॉस'च्या घरात मेरी कोमचा खेळ कसा असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. टास्क, नॉमिनेशन्स, मैत्री, मतभेद आणि सतत कॅमेऱ्यांच्या नजरेखाली राहण्याची आव्हाने मेरी कोम कशी पेलणार पाहणे महत्त्वाचे ठरेल. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT