Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna  SAAM TV
मनोरंजन बातम्या

BB 19 Winner-Gaurav Khanna : "ते विचारत राहिले, GK काय करेल?"; 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलल्यावर गौरव खन्नाची पहिली पोस्ट

Gaurav Khanna First Post After BB 19 Winning : 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडला आहे. 'बिग बॉस १९'चा विजेता गौरव खन्ना ठरला. विजयानंतर गौरवने एक खास पोस्ट केली आहे.

Shreya Maskar

गौरव खन्ना 'बिग बॉस १९' चा विजेता ठरला आहे.

गौरव खन्नाने विजयानंतर सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे.

गौरव खन्नाने बायकोसोबत सुंदर फोटो टाकून खास कॅप्शन लिहिलं आहे.

'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले काल (7 नोव्हेंबर) ला थाटात पार पडला आहे. टॉप ३ मध्ये प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट झळकले. प्रणित मोरे आणि फरहाना भट्टला मागे टाकून गौरव खन्ना 'बिग बॉस १९'चा विजेता (BB 19 Winner-Gaurav Khanna) ठरला. फरहाना भट्ट पहिली रन-रप तर प्रणित मोरे दुसरा रन-रप आला. गौरव खन्नाचे यश पाहून त्याची बायको आकांक्षा खूप खुश झाली. सध्या गौरव खन्नाच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.

गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'चा विजेता झाल्यावर सोशल मीडियावर पहिली खास पोस्ट केली आहे. ज्यात तो , त्याची बायको आणि चमकदार ट्ऱॉफी दिसत आहे. गौरवने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी घेऊन पोज करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत GK ने आपली ट्ऱॉफी बायकोच्या हातात दिलेली पाहायला मिळत आहे. दोघेही फोटोमध्ये खूप खुश आनंदी दिसत आहे. या पोस्टला गौरवने खास कॅप्शन दिले आहे.

गौरव खन्नाची पोस्ट

"तीन महिन्यांचा प्रवास अखेर संपला... आणि त्याचा किती मोठा शेवट झाला आहे. ट्रॉफी घरी आली... ते विचारत राहिले, "जीके काय करेल?" आणि जसे आपण नेहमी म्हणतो की जीके आपल्या सर्वांसाठी ट्रॉफी घरी आणेल. त्याने तसे केले. हा प्रवास अतिशय सुंदर पद्धतीने जबरदस्त ठरला. आम्ही गौरवसोबत प्रत्येक दिवस, प्रत्येक यश, प्रत्येक अपयशावर, सन्मान प्रत्येक क्षणी जगलो आहोत. आणि आज, हा विजय वैयक्तिक वाटतो.हा विजय प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याने मतदान केले, जे त्याच्यासोबत उभे राहिले, ज्याने त्याचे स्वप्न साकार केले.आज, आपण फक्त ट्रॉफी जिंकल्याचा आनंज साजरी करत नाही आहोत. तर आपण विश्वास, प्रेम आणि एकता साजरी करत आहोत. आपण एकत्र जिंकलो आहोत.

तुमचे मानापासून धन्यवाद!"

सध्या गौरव खन्नावर चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव होत आहे. गौरवने पौस्ट मधून त्याला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल थँक्यू बोला आहे. आता गौरव खन्नाला 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये मिळाले आहेत. आता गौरव खन्नाचा चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढील पंधरा दिवस कसबा गणपती मंदिर बंद राहणार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹ २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली मोठी अपडेट

Walking Mistakes: वजन कमी करण्यासाठी रोज चालायला जाताय? मग या चुका होणार नाहीत याची घ्या काळजी

Tejaswini Lonari Honeymoon Photos: अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची हनिमून ट्रिप, रोमॅन्टिक पहिला फोटो आला समोर

खुशखबर! टोल माफीवर सरकारचा मोठा निर्णय, या वाहनांना सगळीकडेच टोलमाफ

SCROLL FOR NEXT