Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19'च्या घरामध्ये राडा; 5 सदस्य नॉमिनेट, कुणाचा पत्ता कट होणार?

Bigg Boss 19 Week 2 Nominations : बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. घरातून बाहेर जाण्यासाठी दुसऱ्या आठवड्यात पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे.

दुसऱ्या आठवड्यात पाच स्पर्धक नॉमिनेट झाले आहे.

नॉमिनेशनच्या दरम्यान कुनिका सदानंद आणि मृदुल तिवारी यांच्यात भांडण होते.

'बिग बॉस 19'चा (Bigg Boss 19) गेम दिवसेंदिवस रंगतदार होत जात आहे. पहिल्या दिवसापासून घरात भांडणे पाहायला मिळत आहेत. नुकतीच 'बिग बॉस 19'च्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. घरातील पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये देखील सदस्यांना खूप राडा घातला. कुनिका सदानंदने मृदुल तिवारीला नॉमिनेट केले.

मृदुल तिवारी-कुनिका सदानंद भांडण

कुनिका सदानंद मृदुल तिवारीला नॉमिनेट करते. कुनिका मृदुलला 'बिन पींडी का लोटा' म्हणते. तेव्हा मृदुल तिवारी उत्तर देत म्हणतो की, "तुमच्या सोबत जो राहणार, तुमच्या पुढे-मागे करणार तो तुमच्यासाठी चांगला आहे. मी तुमची किंवा इतरांची कोणाची चमचागिरी करणार नाही." मृदुल तिवारीचे हे वाक्य ऐकताच घरातील सर्वजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. नॉमिनेशन टास्कमध्ये 5 फेऱ्या होत्या. ज्यातून 5 स्पर्धक नॉमिनेट झाले.

पाच स्पर्धक नॉमिनेट

  • अवेज दरबार

  • मृदुल तिवारी

  • कुनिका सदानंद

  • तान्या मित्तल

  • अमाल मलिक

दुसऱ्या आठवड्यात 'बिग बॉस 19'च्या घरातून कोण बाहेर जाणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नॉमिनेट झालेले सदस्य स्वतःला सुरक्षित करण्यासाठी कसा गेम खेळतात आणि बिग बॉसच्या घरात अजून कोणता राडा-भांडणे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'बिग बॉस 19' कुठे पाहाल?

सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT