'परम सुंदरी' चित्रपट 29 ऑगस्टला रिलीज झाला.
परम सुंदरी' चित्रपटाने पाचव्या दिवशी मंगळवारी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
'परम सुंदरी' चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra ) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) 'परम सुंदरी' (Param Sundari) चित्रपटाने पाचव्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'परम सुंदरी'ने सात चित्रपटांना मागे टाकले आहे. 'परम सुंदरी' रोमँटिक - कॉमेडी ड्रामा 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पाच दिवसांत बंपर कमाई केली आहे. 'परम सुंदरी' चित्रपटाने पाचव्या दिवशी मंगळवारी किती कमाई केली, जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये असून लवकरच सिनेमा आपले बजेट वसूल करणार असल्याचे चित्र दिसत आहे. 'परम सुंदरी' चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-जान्हवीच्या 'परम सुंदरी' चित्रपटाने 34 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. पहिल्या मंगळवारी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पहिला दिवस - 7.25 कोटी रुपये
दुसरा दिवस - 9.25 कोटी रुपये
तिसरा दिवस - 10.25 कोटी रुपये
चौथा दिवस - 3.25 कोटी रुपये
पाचवा दिवस - 4.25 कोटी रुपये
एकूण कलेक्शन - 34.25 कोटी रुपये
मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी'ने पाचव्या दिवशी 7 चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. यात शाहिद कपूरचा 'देवा', अजय देवगणचा 'आझाद', इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो', खुशी कपूरचा 'लवयापा', आदित्य रॉय कपूरचा 'मेट्रो इन डिनो', अर्जुन कपूरचा 'मेरे हसबंड की बीवी' आणि जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' यांचा समावेश आहे.
'देवा' चित्रपटाने पाच दिवसांत 24.3 कोटी रुपये, 'आझाद' ने 5.8 कोटी रुपये, 'ग्राउंड झिरो' ने 6.7 कोटी रुपये, 'लवयापा'ने 5.65 कोटी रुपये,'मेट्रो इन डिनो' ने 22.25 कोटी रुपये, 'मेरे हसबंड की बीवी' ने 5.65 कोटी रुपये आणि 'द डिप्लोमॅट' ने 16.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'परम सुंदरी' चित्रपट अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा' चा रेकॉर्ड ब्रेक करेल अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.