स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका संपणार आहे.
तसेच 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
'लपंडाव' आणि 'नशीबवान' या दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत.
सध्या नवीन मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचा नवीन मालिकांना चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र नवीन मालिकांसोबत जुन्या काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. टीआरपीसाठी चॅनल नवनवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात आता स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका संपणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि आता अजून एक मालिका बंद होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' (Aai Ani Baba Retire Hot Aahet ) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका संपणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत मराठमोळी अभिनेत्री निवेदिता सराफ या मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत कौटुंबिक वाद, कौटुंबिक प्रेम पाहायला मिळाले. रिटायरमेंट नंतरची गोष्ट पाहताना प्रेक्षकांचे अनेक वेळा डोळे पाणावले.
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका डिसेंबर 2024मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वाजता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. मात्र आता लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' आणि 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिका संपल्यावर दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चाहते नवीन मालिकांसाठी उत्सुक आहेत.
मराठी अभिनेत्री रूपाली भोसलेची 'लपंडाव' मालिका 15 सप्टेंबरपासून सोमवार-शनिवार दुपारी 2:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे.
मराठी अभिनेता अजय पूरकरची 'नशीबवान' मालिका 15 सप्टेंबरपासून सोमवार-शुक्रवार रात्री 9:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.