Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

440 व्होल्टचा धक्का! Bigg Boss 19च्या 'या' सदस्याला मिळाले 'तिकीट टू फिनाले'

Bigg Boss 19 -Ticket To Finale : 'बिग बॉस 19' चा खेळ शेवटच्या टप्प्यात आला आहे. घरात 'तिकीट टू फिनाले' टास्क रंगला आहे. चार सदस्यांना 'तिकीट टू फिनाले' मिळाले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'चा धमाकेदार ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे.

घरात नुकताच 'तिकीट टू फिनाले'चा टास्क झाला आहे.

घरातील चार सदस्यांना 'तिकीट टू फिनाले' मिळाले.

'बिग बॉस 19' चा खेळ आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. डिसेंबरमध्ये 'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 'बिग बॉस 19' ची ट्रॉफी कोण उचलणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. नुकताच घरात 'तिकीट टू फिनाले' टास्क पार पडला आहे. याचा व्हिडीओ बिग बॉसने शेअर केला आहे. या टास्कमध्ये एकूण चार सदस्यांना 'तिकीट टू फिनाले' मिळते. त्यातील काही नाव वाचून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, घरातील सर्व सदस्य असेंबली रूमध्ये एकत्र येतात. तिथे 'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेचे तिकीट ठेवलेले असते. त्यानंतर बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना एक मोठा निर्णय घेण्यास सांगतात. मालती आणि शहबाज यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री असल्यामुळे त्यांना 'तिकीट टू फिनाले' टास्क खेळायला द्यायचा की नाही बिग बॉस घरातील सदस्यांना निश्चित करायला सांगतात.

'तिकीट टू फिनाले' मिळालेले स्पर्धक

  1. अशनूर कौर

  2. प्रणित मोरे

  3. गौरव खन्ना

  4. फरहाना भट्ट

फरहाना भट्ट आणि अशनूर कौरच्या नावाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कारण फरहाना भट्ट घराबाहेर जाणार असल्याचे बोले जात होते. तर अशनूर कौर मजबूत दावेदार नसल्याचे बोले जात होते. आता बिग बॉसच्या घरातील तान्या मित्तल, अमाल मलिक, मालती चहर आणि शहबाज या सदस्यांपैकी कोणाला 'तिकीट टू फिनाले' मिळणार आणि कोणाचा बिग बॉसचा प्रवास संपणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या 'वीकेंड का वार' कुनिका घराबाहेर जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT