Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss 19 Third Week Elimination : 'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. तिसऱ्या आठवड्यात चार सदस्य घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या घरातून बाहेर जाण्यासाठी तिसऱ्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली.

तिसऱ्या आठवड्यात चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस 19'च्या तिसऱ्या आठवड्यात डबल एलिमिनेशन होणार असल्याचे बोले जात आहे.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरी नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. यामध्ये देखील घरातील सदस्य एकमेकांना सुनावताना दिसले. हा बिग बॉसचा तिसरा आठवडा सुरू आहे. दोन आठवडे बिग बॉसच्या घरातून एकही सदस्य बाहेर पडला नाही. त्यामुळे तिसऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशनकडे ( Third Week Elimination) प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

नॉमिनेशन टास्क काय?

एलिमिनेशन टास्कमध्ये दोन सदस्य 19 मिनिटांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. सर्व घरातील सदस्यांच्या जोड्या बनवण्यात आल्या. या टास्कमध्ये मुलीला आरशासमोर मेकअप रूममध्ये बसावले आणि मुलाला स्कूटरवर बसून 19 मिनिटे मोजायला सांगितली. घरातील सदस्यांना असा टास्क देण्यात आला होता की, कोणतीही जोडी परफॉर्म करत असेल तर त्यांना त्रास देऊ विचलित करण्याचा प्रयत्न करा.

नॉमिनेशन टास्कदरम्यान सदस्यांनी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप टीका-टिपण्या केल्यामुळे काहींना राग अनावर झाला तर काही सदस्य भावुक झाले. नॉमिनेशन टास्कमध्ये कुनिका सदानंद तान्या मित्तलला बोलते की, "तुझ्या आईने तुला काहीही शिकवले नाही..." ज्यामुळे तान्या मित्तलला खूप वाईट वाटते. अभिषेक अवेज दरबार आणि नगमा मिरजकरसाठी मोजणी करत होता. टास्कच्या शेवटी घरातील 4 सदस्या नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस'च्या घरातील 4 सदस्य नॉमिनेट

  • अवेज दरबार

  • नगमा मिरजकर

  • मृदुल तिवारी

  • नतालिया जानोस्जेक

दोन आठवड्यांपासून 'बिग बॉस 19' मधून कोणताही स्पर्धक बाहेर पडलेला नसल्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, तिसऱ्या आठवड्यात दोन सदस्य नॉमिनेट होणार असल्याचे बोले जात आहे. या आठवड्यात डबल एलिमिनेशनचा घरातील सदस्यांना मोठा धक्का बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

KDMC News : वाहतूक कोंडीमुळे १ मिनिटे उशीर झाला, केडीएमसीच्या नोकरभरतीची उमेदवारी हुकली, परीक्षार्थींचा संताप

SCROLL FOR NEXT