Bigg Boss 19' SAAM TV
मनोरंजन बातम्या

प्रणित मोरेनंतर 'Bigg Boss 19'च्या घरात प्रसिद्ध कॉमेडियनची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Bigg Boss 19-Comedian Entry : 'बिग बॉस 19' च्या घरी प्रणित मोरेनंतर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनची एन्ट्री झाली आहे. त्याने घरात कसा धुमाकूळ घातला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या घरातून जीशान कादरीची एक्झिट झाली आहे.

घरात प्रणित मोरेनंतर आणखी एका कॉमेडियनची एन्ट्री झाली आहे.

'वीकेंड का वार'ला रवी गुप्ता घरात आला.

'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच 'वीकेंड का वार' पार पडला आहे. घरातून जीशान कादरी (Zeishan Quadri) ची एक्झिट झाली आहे. ज्यामुळे घरातील काही सदस्य नाराज आहेत. अशात 'वीकेंड का वार'मध्ये एका खास सदस्याची एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात सध्या कॉमेडियन प्रणित मोरे धुमाकूळ घालताना दिसत आहे. अशात आता आणखी एक कॉमेडियन घरात आला आहे.

'वीकेंड का वार'मध्ये पाहुणा कलाकार म्हणून सलमान खानने स्टँड-अप कॉमेडियन रवी गुप्ताचे (Ravi Gupta) स्वागत केले. रवीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. आपल्या कॉमेडी अंदाजमध्ये त्याने घरातील सदस्यांची चांगली शाळा घेतील. सदस्यांची खिल्ली उडवली. रवी गुप्ता अमाल मलिकला त्याच्या घोरण्यावरून बोलला. म्हणाला, "दिवसा इतका मधुर गाणे गाणारा रात्री इतका भयंकर कसं काय घोरू शकतो?"

रवी गुप्ताने प्रणित मोरेसोबत देखील चांगली मस्ती केली. तो प्रणितला म्हणाला, "प्रणित शेरा भाई नंबर विचारत होता. तो म्हणाला जेव्हा बिग बॉस संपेल. सर्वजण घरी जातील तेव्हा सलमान भाई तुला एकट्याला घरी भेटतील..." रवी गुप्ताच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील वातावरण आनंदी झाले. रवी गुप्ताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे इन्स्टाग्राम 3.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.

'बिग बॉस 19'चा आता नवा आठवडा सुरू झाला आहे. आता नवीन आठवड्यात घरातील सदस्य कोणता नवा धुमाकूळ घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच येणार दिवसांत बिग बॉसच्या घरातून कोण नॉमिनेट होणार हे समजेल. तसेच घराचा नवीन कॅप्टन देखील ठरवण्यात येईल. एकंदर 'बिग बॉस 19'चे येणार भाग पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election: धुरळा उडाला! पुणे जिल्हा परिषदेवर 'महिला राज'; ५० टक्के जागा अरक्षित

Jalgaon : शेतकऱ्यांचा उद्रेक; एमआयडीसीसाठी जमीन संपादनाला विरोध, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

कल्याण-डोंबिवलीत महायुतीत दुरावा? शिंदे गटाच्या नेत्याचं भाजपला ओपन चॅलेंज,'याल तर सोबत, नाहीतर...'

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात खळबळ! अजित पवारांचा 'हा' आमदार भाजपच्या वाटेवर? त्या नेत्याच्या वक्तव्याने प्रवेशाची चर्चा रंगली|VIDEO

Shocking Death : झोपेत बेडवरून पडल्याने वाहतूक पोलिसाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT