Bigg Boss 19 : 'वीकेंड का वार'मध्ये काय झाले? सलमान खानने घेतली 'या' सदस्यांची शाळा

Salman Khan-Weekend Ka Vaar : 'वीकेंड का वार' चांगलाच रंगला आहे. सलमान खानने घरातील सदस्यांची शाळा घेतली आहे. भाईजान कोणाला काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Salman Khan-Weekend Ka Vaar
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

सलमान खान 'वीकेंड का वार'मध्ये स्पर्धकांना फटकारताना दिसला.

गौरव खन्ना आणि मृदुल तिवारीला सलमान खानने चांगले सुनावले.

नेहलची 'बिग बॉस 19'च्या घरातून एक्झिट झाली आहे.

बिग बॉसच्या (Bigg Boss 19) घरात 'वीकेंड का वार' चांगलाच रंगला आहे. सलमान खानने घरातील सदस्यांची शाळा घेतली आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानने 'वीकेंड का वार' होस्ट केला नव्हता. कारण तो आगमी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्यामुळे फराह खानने शो होस्ट केला. मात्र या आठवड्यात भाईजानने काही सदस्यांना चांगलेच सुनावले आहे.

सलमानने गौरव खन्नाला सुनावले खडेबोल

'बिग बॉस 19' नवीन प्रोमोमध्ये सलमान खान मृदुल तिवारी आणि गौरव खन्नाला फटकारले आहे. सलमान खान गौरव खन्नाला म्हणतो की, "गौरव तू फ्रंटफूटवर खेळायला घाबरत आहे. संपूर्ण आठवड्यात फक्त २० मिनिटे तू दिसला आहेस. पलक झपके आप चले गये."

सलमानने मृदुल तिवारीला फटकारले

सलमान खान मृदुल तिवारीला म्हणतो की, " तू नेहमी कोणाच्या तरी छत्र छायेत राहतोस. प्लस वन कॅटेगरीत तू दिसत आहेस. तुझे किती फॉलोअर्स आहेत?" यावर उत्तर देत मृदुल म्हणतो, " 35 मिलियन भाई..." त्यावर पुन्हा सलमान बोलतो, "तुम्हाला वाटते की मी काहीही केले नाही केले तरी पुरेसे मत मिळतील पण अस होणार नाही... कोणीही मत देणार नाही. तू शोमध्ये दिसत नाही आहेस. मग वेळ आल्यावर तुमचे फॉलोअर्स नक्कीच हात वर करतील."

कोणीची एक्झिट?

'बिग बॉस 19'च्या या आठवड्यात घरातून नेहलची एक्झिट झाली आहे. मात्र बिग बॉसने यात मोठा ट्विस्ट आणला आहे. नेहलला घराबाहेर न आणता. सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. आता 'बिग बॉस 19' पाहणे अधिकच मनोरंजक झाले आहे.

Salman Khan-Weekend Ka Vaar
Rekha : रेखा यांच्या पुढे माधुरी-उर्मिला पडल्या फिक्या; हटके डान्सने वेधलं लक्ष, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com