हार्ड डिस्क अन् सेलफोनचा गैरवापर; चित्रपट निर्मात्याच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Filmmaker : मनोरंजन सृष्टीतून मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्मात्याच्या कर्मचाऱ्यांवर हार्ड डिस्क आणि सेलफोनचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Filmmaker
Entertainmentyandex
Published On
Summary

हिंदी चित्रपट निर्मात्याच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हार्ड डिस्क आणि सेलफोनचा गैरवापर केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांवर आहे.

पोलीस घडलेल्या घटनेचा तपास घेत आहेत.

मनोरंजन सृष्टीतून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपट निर्मात्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका प्रॉडक्शन मॅनेजरने चित्रपटांची हार्ड डिस्क आणि दोन मोबाईल फोनचा गैरवापर केल्याबद्दल कार्यालयात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. वर्सोवा पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तसेच पोलीसांचा अधिक तपास सुरू आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

एफआयआरनुसार, चित्रपट निर्मात्याने मार्च 2025 मध्ये हार्ड डिस्क हरवल्याबद्दल सांगितले. हार्ड डिस्कमधील डेटाचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याला मॅनेजर राकेशवर याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी सर्व ऑफिस कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले.राकेशला रिपोर्ट करणारा एडिटिंग असिस्टंट जितेंद्र याचाकडे सर्व हार्ड डिस्कचा चार्ज होता.

Filmmaker
Amruta Malwadkar : लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; नवऱ्याचे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शी आहे खास कनेक्शन, पाहा PHOTOS

ऑफिसमधील कोणालाही हार्ड डिस्कची आवश्यकता असेल तर त्यांना जितेंद्रची संपर्क साधावा लागायचा. 13 सप्टेंबर रोजी दोन ऑफिस कर्मचाऱ्यांनी राकेशच्या सांगण्यावरून हार्ड डिस्क विकल्याची कबुली दिली. हार्ड डिस्क 5000 ते 6000 रुपयांना अशोक नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली. कर्मचाऱ्यांनी विक्रीतून मिळालेली अर्धी रक्कम राकेशला दिली.

14 सप्टेंबरला राकेशची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने मार्च ते सप्टेंबर दरम्यान 40 हार्ड डिस्कचा गैरवापर केला असल्याची, हार्ड डिस्क विकल्याची कबुली दिली. जितेंद्रला सर्व हार्ड डिस्क परत देण्यास सांगितले तेव्हा त्यांने फोन बंद केला. तो 19 सप्टेंबरपासून संपर्कात नव्हता. चोरीला गेलेल्या सर्व वस्तूंची किंमत जवळपास 4.8 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Filmmaker
Box Office Collection : 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; शाहरुखच्या 'जवान'ला पछाडलं, तर 'सनी संस्कारी'चा फुसका बार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com