Karan johar weight loss
Karan johar weight lossSaam Tv

Karan johar: 'या' औषधामळे करण जोहरने केलं ४ महिन्यांत १७ किलो वजन कमी? निर्मात्याने सांगितले Weight Loss सिक्रेट

Karan johar weight loss : करण जोहर गेल्या काही काळापासून खूपच फिट दिसत आहे. ५२ वर्षांच्या वयातही करणने ३२ वर्षांच्या व्यक्तीप्रमाणे आपला फिटनेस कायम ठेवला आहे. यामागील रहस्य स्वतः करण जोहरने उघड केले आहे.
Published on

Karan johar: करण जोहर गेल्या काही काळापासून खूपच तंदुरुस्त आणि तरुण दिसत आहे. ५२ वर्षांच्या वयातही करणने ३२ वर्षांच्या व्यक्तीप्रमाणे आपला फिटनेस कायम ठेवला आहे. यामागील रहस्य काय असू शकते, हे स्वतः करण जोहरने उघड केले आहे. त्याने केवळ त्याचे वजन कमी केले नाही तर त्यासाठीची पद्धत देखील सांगितली आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर गेल्या काही काळापासून त्याच्या अद्भुत ट्रांसफॉर्ममुळे चर्चेत आहे. करण जोहरने अचानक अनेक किलो वजन कमी केले आहे आणि आता तो पूर्वीपेक्षा जास्त फिट दिसत आहे. आता त्याच्याकडे पाहून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की ५२ वर्षांच्या वयातही करण जोहर ३२ वर्षांच्या पुरुषासारखा दिसतो. त्याचे ट्रांसफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते.

Karan johar weight loss
Virat Kohli-Anushka Sharma: 'धावत जाऊन मारली मिठी...'; भारताच्या विजयानंतर विराट-अनुष्काचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

करण जोहरने वयाची ५० वर्षे ओलांडली आहेत, परंतु या वयातही तो तरुण दिसत आहे. त्याने स्वतः त्याच्या तारुण्याचे रहस्य उलगडले आहे. ५२ वर्षांच्या करणने अवघ्या चार महिन्यांत १७ किलो वजन कमी केले आहे. निरोगी आहार, योग आणि वर्कआउट्सद्वारे त्याने फिटनेस मिळवल्याचे सांगितले.

Karan johar weight loss
Hardik Pandya New Girlfriend: 'ही' परदेशी सुंदरी करते हार्दिक पांड्याला डेट? फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

करणने १७ किलो वजन कसे कमी केले?

आयफा २०२५ दरम्यान करण जोहरने त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला. आयफा २०२५ साठी बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार जयपूरला पोहोचले. करणनेही या कार्यक्रमात उपस्थित होता. यादरम्यान, ग्रीन कार्पेटवर माध्यमांशी बोलताना, त्याने त्याच्या ट्रांसफॉर्मेशनबद्दल सांगितले की, 'हे सर्व योग्य आहार, योगा, निरोगी राहणे आणि चांगले दिसण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याबद्दल आहे.' यातून मी स्वतःला बदलले आहे. जेव्हा एका पत्रकाराने त्याला त्याच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल विचारले तेव्हा करण म्हणाला, 'जर मी तुम्हाला माझा दिनक्रम सांगितला तर मी माझे गुपित उघड करेन.'

करणवर ओझेम्पिक वापरल्याचा आरोप होता

करण जोहरवर ओझेम्पिक (वजन कमी करणारे औषध) वापरल्याचा आरोप होता. २०२४ मध्ये, नेटफ्लिक्स शो 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' मध्ये, अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर यांनी ओझेम्पिक सारख्या औषधाचा उल्लेख केला. यानंतर लोकांनी करण जोहरवर आरोप केले. लोकांचा असा विश्वास होता की करण देखील वजन कमी करण्यासाठी हे औषध वापरत असे. पण आता करणने स्वतः या अफवांना नकार दिला आहे आणि म्हटले आहे की त्याने निरोगी आहार आणि चांगल्या दिनचर्येमुळे त्याचे वजन कमी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com