'बिग बॉस 19'मध्ये दिवाळी सेलिब्रेशन होणार आहे.
'वीकेंड का वार'मध्ये अमाल मलिकचे वडील आले आहेत.
सलमान खान अमाल मलिकला त्याच्या वाईट वागण्यावरून सुनावतो.
'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच या आठवड्यात 'वीकेंड का वार' चांगलाच रंगणार आहे. सलमान खान (Salman khan) घरात गौरव खन्ना, शेहबाज बदेशा आणि अमाल मलिकची (Amaal Mallik) चांगली शाळा घेताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अमाल मलिकचे वडील डब्बू मलिक (Daboo Malik ) बिग बॉसच्या मंचावर आले आहेत.
अमाल मलिक घरात फरहाना भट्टच्या जेवणाचे ताट फेकून देतो. तसेच तिच्या आईबद्दल अपशब्द बोलतो. त्यामुळे 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान अमाल मलिकवर खूप रागवतो. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान अमाल मलिकची शाळा घेताना दिसत आहे. तसेच अमालचे वडील त्याला समजवून सांगत आहे. मात्र शेवटी अमालच्या वडीलांना अश्रू अनावर होतात आणि ते रडू लागतात. बापाला रडताना पाहून अमाल मलिक देखील रडू लागतो.
सलमान खान अमाल मलिकला चांगले वागायला सांगतो. तशी त्याला शेवटची वॉर्निंग देतो. त्यानंतर अमालचे वडील त्याला समजावतात. अमालचे वडील बोलतात की, "तू भांड पण तुझी जीभ घाणेरडी होऊ देऊ नकोस... " यानंतर अमाल वडीलांना "सॉरी" बोलतो. दोघेही भावुक होऊन रडायला लागतात.
सलमान खानने अमाल मलिकची कानउघाडणी केल्यामुळे प्रेक्षक खूपच खुश आहेत. आता 'वीकेंड का वार'मध्ये कोण घराबाहेर जाणार की दिवाळी असल्यामुळे एलिमिनेशन रद्द होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.