Tharala Tar Mag : ठरलं तर मग! पूर्णा आजीची धमाकेदार एन्ट्री, कोण साकारणार भूमिका?

Tharala Tar Mag Replacement Purna Aaji : 'ठरलं तर मग' मालिकेत नवीन पूर्णा आजीची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ही भूमिका साकारणार आहे.
Tharala Tar Mag Replacement Purna Aaji
Tharala Tar MagSAAM TV
Published On
Summary

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची एन्ट्री झाली आहे.

ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे.

सुभेदारांच्या घरात नवीन पूर्णा आजी आल्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अलिकडेच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकरणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता मात्र याचा खुलासा झाला आहे.

मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे. सुभेदारांच्या घरात पूर्णा आजीची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, पूर्णा आजी घरी येताच प्रियाच्या चांगली थोबाडीत मारते. तर घराबाहेर काढण्याची धमकी देते. पूर्णा आजी घरी परत आल्यामुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जुनला खूप आनंद होतो.

'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) दिसणार आहेत. ज्यामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. त्यांची 'चार दिवस सासूचे' आणि 'होणार सून या घरची' मालिका खूप गाजली. अलिकडेच त्या 'बाईपण भारी देवा ' आणि 'आता थांबायचं नाय!' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दिसल्या.

'ठरलं तर मग' मालिकेत आता पूर्णा आजीच्या एन्ट्रीनंतर मालिकेचे कथानक कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या मालिकेत प्रियाच्या खऱ्या आई-बाबांची एन्ट्री झाली आहे. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुनला रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. 'ठरलं तर मग' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 8:30 वाजता पाहायला मिळते.

Tharala Tar Mag Replacement Purna Aaji
Zaira Wasim : 'दंगल गर्ल'नं गुपचूप उरकलं लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com