Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : गौरव खन्ना नाही; तर मग 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोणाचे नाव?

Bigg Boss 19 Winner : 'बिग बॉस 19'चा आता शेवटचा आठवडा सुरू आहे. मिड वीक एविक्शनमध्ये मालती चहरचा पत्ता कट झाला. बिग बॉसचा विजेता कोण होणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसचा ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

'बिग बॉस 19'ला टॉप ५ स्पर्धक भेटले आहेत.

मिड वीक एविक्शनमध्ये मालती चहर घराबाहेर गेली.

सलमान खानचा रिॲलिटी शो 'बिग बॉस 19' चा आता शेवटचा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात अशनूर कौर, शहबाज यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. तर मिड वीक एविक्शनमध्ये मालती चहर घराबाहेर गेली. बिग बॉसला या सीझनचे टॉप 5 स्पर्धक भेटले आहेत. अशात सुरुवातीपासून गौरव खन्ना 'बिग बॉस 19' ची ट्रॉफी उचलणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र आता गौरव खन्ना नाही तर एका वेगळ्यात सदस्याची विजेता म्हणून चर्चा पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर गौरव खन्नासोबत विजेते पदासाठी महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरेच्या नावाचीही तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. प्रणित मोरे 'बिग बॉस 19'चा विजेता व्हावा असेल महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या संख्येने वाटत आहे. प्रणित मोरेला प्रेक्षकांकडून मते देखील मिळत आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, घरातील सदस्यांचे मत देखील आहे की, प्रणित मोरे विजेता व्हावा. 'बिग बॉस 19' च्या घरातून आतापर्यंत बाहेर पडलेल्या स्पर्धकांपैकी अनेकजण प्रणित मोरेला पाठिंबा देतात. आता 'बिग बॉस 19'चा विजेता नेमका कोण ठरणार हे ग्रँड फिनालेला पाहायला मिळेल.

'बिग बॉस 19'चे टॉप 5 स्पर्धक

  1. गौरव खन्ना

  2. प्रणित मोरे

  3. फरहाना भट्ट

  4. अमाल मलिक

  5. तान्या मित्तल

ग्रँड फिनाले कुठे अन् कधी पाहता येणार?

सलमान खानचा शो 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर रोजी रात्री 9.00 वाजता जिओ सिनेमा आणि डिस्ने+ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री 10:30 वाजता पाहू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Maharashtra News Live Update: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

SCROLL FOR NEXT