Bigg Boss 19  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Bigg Boss 19 Update : सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये मराठी कलाकार झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

सलमान खानच्या 'बिग बॉस 19'ची मोठी अपडेट समोर आली आहे.

'बिग बॉस 19'मध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

'बिग बॉस 19' शो 24 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. सध्या सर्वत्र बिग बॉसची चर्चा पाहायला मिळत आहे. नवीन सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अशात आता 'बिग बॉस 19'मधील स्पर्धकांविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. हिंदी कलाकारांसोबत यंदा मराठी कलाकार देखील बिग बॉसमध्ये झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'बिग बॉस 19' मध्ये मराठी अभिनेते उपेंद्र लिमये सहभागी होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. आता यावर थेट उपेंद्र लिमये (Upendra Limaye ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "मला अनेकांकडून असे विचारण्यात आले की, मी बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमाचा भाग होणार आहे का? तर आता स्पष्ट करू इच्छितो की, मी या शोचा भाग नाही. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद..."

उपेंद्र लिमये यांच्या पोस्टमुळे त्यांच्या 'बिग बॉस 19'मधील एन्ट्रीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. चाहते उपेंद्र लिमये यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आजवर त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच मराठी नाटक आणि मालिका देखील गाजवल्या आहेत. प्रेक्षक त्यांच्या अभिनयाचे दिवाने आहेत.

Upendra Limaye

'बिग बॉस 19' कधी सुरू होणार?

सलमान खानच्या 'बिग बॉस'चा नवा सीझन 24 ऑगस्टपासून सुरू होत आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणता ड्रामा पाहायला मिळणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'बिग बॉस 19' कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. यंदाची 'बिग बॉस'ची थीम राजकारणावर आधारित असल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT