Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Jain Community vs Marathi Ekikaran: कबुतरखान्यावरून जैन समाज आक्रमक झालेला असताना आता मराठी एकीकरण समितीनं याप्रकरणात एन्ट्री घेतलीय. मराठी एकीकरण समितीची नेमकी भूमिका काय? सरकाराला त्यांनी काय इशारा दिलाय?
Marathi Ekikaran Samiti members announcing their protest plan against Kabutarkhana in Mumbai.
Marathi Ekikaran Samiti members announcing their protest plan against Kabutarkhana in Mumbai.Saam Tv
Published On

मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झाला.. अनेकांनी न्याय़ालयाच्या निर्णयाविरोधात जात रस्त्यावर उतरून कबुतरखाना सुरु ठेवण्यासाठी आंदोलन केलं.. तर दुसरीकडे मराठी एकीकरण समितीही आता जैन समाजाच्या अवाजवी मागणीविरोधात आक्रमक झालीय. कबुतरखान्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजानं दिलेला असताना त्याच दिवशी म्हणजे 13 ऑगस्टला न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती आंदोलन करणार आहे..

कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस चिघळतोय. अशातच शातंताप्रिय असणारा जैन समाजाचे मुनी शस्त्र उचलण्याची भाषा करतायत.. त्यामुळे कबुतरखान्यांचा विषय हा आरोग्याशीच नव्हे तर आता धर्मिक प्रथा, पंरपरांशी जोडला जाऊ लागलाय. अशातच कबुतरखान्यासाठी आग्रही असणारे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही सावध पवित्रा घेतलाय..

मानवी आरोग्याचा मुद्दा हाच सगळ्यात महत्वाचा असून त्यादृष्टीने जैन समाजानेही याप्रश्नाकडे पहायला हवं, असा सूर उमटतोय. त्यामुळे भाषा, प्रांत या मुद्यावरून आक्रमक भूमिका मांडणारी एकीकरण समिती आता जैन समाजाच्या अवाजवी मागण्याविरोधात स्थानिक मराठी माणसाची एकजुट कशी करणार? एकीकरण समितीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्यास जैन समाज नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com