Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातील गाण्यावर सलमान-काजोल थिरकले; भन्नाट केमिस्ट्री पाहून सर्वजण अवाक, पाहा VIDEO

Kajol-Salman Dance Video : 'बिग बॉस 19'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री काजोलची एन्ट्री झाली आहे. काजोल आणि सलमान खान भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री काजोल आली आहे.

काजोलची 'द ट्रायल २' वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे.

काजोल आणि सलमानने त्यांच्या 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

'बिग बॉस 19'चा (Bigg Boss 19) गेम दिवसेंदिवस अधिक रंजक होत जाताना दिसत आहे. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान गौरव खन्ना आणि मृदुल तिवारीची चांगली शाळा घेतो. तर नेहलची 'बिग बॉस 19'मधून एक्झिट दाखवली आहे. मात्र तिला घराबाहेर न काढता, सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नेहल आता कोणता गेम प्लान करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. अशात आता 'बिग बॉस 19'चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'वीकेंड का वार'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol ) आणि जीतू सेनगुप्ताची दमदार एन्ट्री झाली आहे. याचा प्रोमो कर्लस टिव्हीने शेअर केला आहे. ज्यात सलमान खान (salman ) आणि काजोल भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. जीतू सेनगुप्ता काजोल आणि सलमान खानला 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातील एक सीन रि-क्रिएट करण्यास सांगतो. तेव्हा काजोल मजेमध्ये सलमानला म्हणते की, "ही एक चांगली संधी आहे, फक्त टी-शर्ट आणि जॅकेट काढून टाक..."

काजोल आणि सलमान खान अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार 2' मधील 'पहला तू दूजा तू' गाण्यावर हुकस्टेप करतात. त्यानंतर दोघेही 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातील 'ओढनी चुनरिया' या गाण्यावर थिकरताना दिसतात. गाण्यातील काही स्टेप्स करतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पुन्हा एकदा काजोल आणि सलमानला एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत.

काजोलची नवीन सीरिज

काजोलची 'द ट्रायल २' वेब सीरिज 19 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. सीरिजमध्ये जीतू सेनगुप्ता आणि काजोल मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Mucchal: स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याचे शिक्षण किती झालंय?

Maharashtra Live News Update : विजय सत्याचाच होतो, असत्याचा नाही - पंतप्रधान मोदी

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

स्मृती मानधनाला पलाश धोका देतोय? लग्न पुढे ढकलण्याचे कारण काय? फ्लर्टी चॅट्स व्हायरल

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

SCROLL FOR NEXT