Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

‘Bigg Boss 19’ मध्ये फराह खान अमाल मालिकवर नाराज, नेहल चुडासमाला सुनावले खडेबोल

Farah Khan-Weekend Ka Vaar : आज ‘वीकेंड का वार’ फराह खान होस्ट करणार आहे. फराह खान नेहल चुडासमावर भडकली. तर अमाल मालिकवर रागवते.

Shreya Maskar

‘वीकेंड का वार’मध्ये फराह खान नेहल चुडासमा आणि बसीर अलीची शाळा घेते.

फराह खान नेहल चुडासमाला केलेल्या कृतीबद्दल चांगले सुनावते.

नेहलची वारंवार माफी मागितल्यामुळे फराह खान अमाल मालिकवर रागवते.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात प्रत्येक दिवशी नवीन वाद पाहायला मिळतो. सध्या अमाल मालिक चांगलाच चर्चेत आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये खूप राडा पाहायला मिळतो. तिसऱ्या आठवड्यात अमाल मालिक (Amaal Mallik) घराचा कॅप्टन झाला. कॅप्टन्सी टास्क दरम्यान अमाल मालिक आणि नेहल चुडासमा (Nehal Chudasama) यांच्यात झटापट पाहायला मिळाली. खेळ दरम्यान नेहल चुडासमाने अमाल मालिकवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अमाल मालिक वारंवार नेहलची माफी मागताना दिसत आहे. यात त्याची काही चूक नव्हती. घरातील काही सदस्य अमाल मालिकच्या बाजूने बोलत होते. तर काही सदस्य त्याच्या विरोध बोलत आहे.नेहलची टास्क दरम्यानची कृती पाहून प्रेक्षकांना देखील राग आला आहे. प्रेक्षकांकडून अमाल मालिकला पाठिंबा मिळत आहे. तर नेहलला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

आता ‘वीकेंड का वार’मध्ये फराह खान नेहलला चांगली फटकारते. तर सतत सॉरी बोल्यामुळे अमाल मालिकवर देखील रागवते. फराह खान नेहलला Woman Card खेळल्याबद्दल चांगले सुनावते. तर अमाल मालिकवर नाराजी व्यक्त करत फराह खान म्हणाली, “तू वारंवार नेहलची माफी का मागत होतास? तुला माहित नाही का की यात तुझी चूक नव्हती...”

कोण होणार नॉमिनेट?

मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'च्या तिसऱ्या आठवड्यात डबल एलिमिनेशन पार पडणार आहे. नगमा मिरजकर (Nagma Mirajkar) आणि नतालिया जानोस्जेक (Natalia Janoszek ) यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट होणार आहे. यांना सर्वात कमी मते मिळाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारी पर्यंत स्थगिती

थंडीचा कडाका; शाळांच्या वेळेत मोठा बदल, पालिकेने काय निर्णय घेतला? VIDEO

Pune : "प्रार्थनेने एड्स बरा होतो... " शहरात पत्रक वाटली, पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहचले

LIC Saral Pension: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

Traffic Police: ट्राफिक पोलिस सोडून इतर पोलिस वाहनांवर कारवाई करू शकतात का? मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

SCROLL FOR NEXT