Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : फॅमिली वीक आधी Bigg Boss 19 च्या घरात मोठा राडा, अमाल-तान्यामध्ये कडाक्याचे भांडण, पाहा VIDEO

Bigg Boss 19-Amaal Tanya Fight : बिग बॉसच्या घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अमाल मलिक आणि तान्या मित्तल मध्ये मोठे भांडण झाले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' मध्ये आता फक्त 9 सदस्य उरले आहेत.

'बिग बॉस 19' च्या घरी फॅमिली वीक पाहायला मिळत आहे.

अमाल मलिक-तान्या मित्तलमध्ये भांडण झाले आहे.

बिग बॉसच्या घरात नात्यांचे समीकरण मिनिटांत बदलताना दिसते. एकेकाळी चांगले मित्र असलेले अमाल-तान्या आता एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. रोज त्यांच्यात वाद होताना पाहायला मिळत आहेत. घरात फॅमिली वीक सुरू होण्यापूर्वी अमाल मलिक-तान्या मित्तल यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले.

अमाल मलिक-तान्या मित्तल यांच्यात फक्त या ग्लास धुवण्यावरून भांडण होते. अमाल मलिक भांडी घासत असतो. अमाल-मालतीसोबत भांडी घासण्याचे काम करत असतो. तेव्हा मागून तान्या मित्तल येते आणि त्याला एक ग्लास धुवायला सांगते. हे पाहून कुनिका आली आणि अमाल तिला काहीतरी बोलतो. हे पाहून तान्याने अमालला बोलते की, तुला ग्लास धुवायचे नसेल तर नको धुवू आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद होतो.

अमाल तान्याला ग्लास परत करतो. तान्या अमालला त्याच्या घाणेरड्य स्वभावावरून खूप बोलते. हे ऐकून अमाल खूप संतापतो. म्हणतो, मी दुसऱ्यांचे कप किंवा ग्लास धुवणार नाही त्यावर तान्या म्हणते, तिने याआधी अनेक ग्लास धुतले आहेत. दोघांमधील वाद काही सेकंदातच वाढतो. त्यानंतर अमाल मलिक आणि फरहानामध्ये भांडण होते.

फॅमिली वीक

सध्या 'बिग बॉस 19' फॅमिली वीक सुरू आहे. फॅमिली वीकमध्ये कुनिकाचा मुलगा, फरहानाची आई, गौरवची बायको घरी आले आहे. कुटुंबाला भेटून घरातील सदस्य खूपच भावुक झाले आहेत. तसेच घरातील वातावरण आनंदी पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसमध्ये स्पर्धकांचे कुटुंबीय कोणता धुमाकूळ घालतात. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॉप 9 स्पर्धक

  1. गौरव खन्ना

  2. प्रणित मोरे,

  3. अमाल मलिक,

  4. तान्या मित्तल

  5. अशनूर कौर

  6. कुनिका सदानंद

  7. फरहाना भट्ट

  8. मालती चहर

  9. शहबाज बदेशा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Arijit Singh: 'बॉर्डर २'मुळे अरिजीत सिंगने सोडलं प्लेबॅक सिंगिंग; प्रसिद्ध निर्मात्याने सांगितलं खरं कारण

India Tourism : 'या' शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते, एकदा जाऊन नक्कीच भेट द्या

VSR Ventures: अपघातग्रस्त विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली? कंपनीवर प्रश्नचिन्ह

Trending Mangalsutra Designs: महिलांना आवडणाऱ्या मंगळसूत्राच्या ट्रेडिंग्स 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT