Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19'च्या घरात तान्या मित्तल झाली राजकुमारी; अमाल मलिकने स्वतःच्या हातांनी जेवण भरवले, पाहा VIDEO

Amaal Mallik- Tanya Mittal : 'बिग बॉस 19'च्या घरात सदस्य धुमाकूळ घालत आहे. अमाल मलिक तान्या मित्तलला प्रिंसेस ट्रीटमेंट देत आहे. अमालने तान्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवले.

Shreya Maskar

तान्या मित्तल 'बिग बॉस 19'च्या घरची राणी झाली आहे.

अमाल मलिकने तान्याला प्रिंसेस ट्रीटमेंट दिली.

अमाल मलिक प्रेमाने तान्या मित्तलला स्वतःच्या हाताने जेवू घालतो.

'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) दिवसेंदिवस अधिक रंजक होत जाताना दिसत आहे. 'बिग बॉस 19' च्या घरात तान्या मित्तलला प्रिंसेस ट्रीटमेंट मिळाली आहे. बिग बॉसने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तान्या मित्तल, अमाल मलिक, गौरव, शेहबाज तुफान मजा मस्ती करताना दिसत आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अमाल मलिक स्वतःच्या हाताने तान्या मित्तलला (Tanya Mittal ) भरवताना दिसत आहे.

तान्या मित्तल घरात सुंदर पिवळ्या रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी नेसून वावरत असते. तिने हातात राजकुमारी सारखे हातमोजे घातलेले असतात. शहबाज बदेशा तान्यासाठी जेवणाचे ताट भरून घेऊन येतो. त्यानंतर राजा बनलेल्या अमालने तान्याला जेवण भरवले. तेव्हा तान्या हसताना, लाजताना दिसते. त्यानंतर अमाल (Amaal Mallik) आणि तान्याला शहबाज उशीने हवा घालताना दिसतो. त्यानंतर झीशान तान्याला पाणी देतो. सर्वजण तुफान कॉमेडी करताना दिसत आहेत. अशाप्रकारे तान्या मित्तलचे राणी होण्याचे स्वप्न पूर्ण होते.

'बिग बॉस 19'च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. घरातून बाहेर जाण्यासाठी सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात गौरव खन्ना, अशनूर कौर, आवेज दरबार, प्रणित मोरे, मृदुल तिवारी आणि नीलम यांची नावे आहेत. आता 'वीकेंड का वार' मध्ये कोण घराबाहेर जाणार आणि कोण घरात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तान्या नीलमसोबत गार्डनर एरियात बसलेली असताना तिला बोलते की, "मी ग्वाल्हेरहून आग्राला कॉफी पिण्यासाठी जाते. पण मी कॉफी तिथे पित नाही. माझ्या गाडीत एक बर्फाचा डबा घेऊन जाते, ज्यामध्ये मी माझी कॉफी भरते. नंतर ग्वाल्हेरला परत येते आणि माझ्या बागेत बसून कॉफी मी पिते." 'बिग बॉस 19'च्या घरात असेच तान्या मित्तलचे अतरंगी किस्से ऐकायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, 'त्या' व्हिडीओमुळे ८ जणांच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Fire : कांदिवलीतल्या चाळीत अग्नि तांडव, ७ जण होरपळले, गॅस सिलिंडरच्या लिकेजमुळे उडाला भडका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! आधार कार्डशिवाय ₹१५०० विसरा, e-KYC करण्याआधी वाचा

Maharashtra Live News Update: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

SCROLL FOR NEXT