Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Bossनं घरातील 2 सदस्यांना सुनावली कठोर शिक्षा, संपूर्ण सीझनसाठी केले नॉमिनेट

Bigg Boss 19 Update: 'बिग बॉस 19'च्या घरात सदस्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिग बॉसने दोन सदस्यांना संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले आहे. घरात नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या घरात कामावरून पुन्हा जोरदार राडा झाला आहे.

घरात अमाल मलिक, कुनिका, अभिषेक बजाज, शेहबाज यांच्यात तुफान भांडण झाले.

बिग बॉसने घरातील दोन सदस्यांना संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले.

'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) तिसऱ्या आठवड्यात 'वीकेंड का वार'मध्ये नगमा मिरजकर आणि नतालिया जानोस्जेक यांना घराच निरोप घ्यावा लागला. थेट बिग बॉसने दोन स्पर्धकांना घराबाहेरचा रस्ता दाखवला. अशात आता 'बिग बॉस 19'च्या घरातून मोठी अपडेट समोर आली आहे. बिग बॉसने घरातील दोन सदस्यांना थेट संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले आहे. नेमकं घरात काय घडले, जाणून घेऊयात.

बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सुरुवातील किचन ड्युटीवरून कुनिका आणि अमाल मलिक यांच्यात भांडण होताना दिसते. अमाल मलिक स्वयंपाकघरातील जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना व्हिडीओत दिसत आहे. अमाल मलिक कुनिकाला म्हणतो की, "मी किचन सांभाळतो..." तेव्हा कुनिका म्हणते, "खूप उपकार झाले..." त्यानंतर अमाल बोलतो, "मी तुमचा आदर ठेवून बोलतो. जर तुमची किचन ड्युटी नाही तर तुम्ही किचनमध्ये का जाता?" यावर कुनिका म्हणाली की, "हा आदर देत आहेस मला..." अमाल म्हणतो, "आदर देणे म्हणजे कुणाचा नोकर होणे असे नाही..."

प्रोमोच्या दुसऱ्या भागात अभिषेक बजाज म्हणतो की, "लोक अनादर करतात..." त्यानंतर शेहबाज कुनिकाची बाजू घेत अभिषेकशी भांडायला येतो आणि त्यांच्यात तुफान राडा होतो. हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचते. घरातील सदस्य त्यांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अभिषेक बजाज आणि शेहबाज मधील भांडणांमुळे त्यांना बिग बॉस कठोर शिक्षा सुनावतात. अभिषेक बजाज आणि शेहबाजला बिग बॉस संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करतात. ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसतो.

बिग बॉसच्या घरात चौथ्या आठवड्याची सुरूवात खूपच दमदार झाली आहे. अजून नॉमिनेशन टास्क, कॅप्टन्सी टास्क आणि 'वीकेंड का वार' या गोष्टी बाकी आहेत. नॉमिनेशन टास्क, कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धक कोणता नवीन गोंधळ घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान अभिषेक आणि शेहबाजची कशी शाळा घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस फाडली; आता पोलिसांकडून आई-वडिलांचा शोध सुरु

रूग्णालयातून पळून घरी आला, दुसऱ्या दिवशी रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळला; सांगलीत नेमकं काय घडलं?

Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती

भगव्या शालीवरून कोकणात वाद पेटला; नितेश राणे विरुद्ध उदय सामंत|VIDEO

SCROLL FOR NEXT