Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

"क्या खूब चलेगी यहाँ घरवालों की सरकार..."; 'Bigg Boss 19'च्या घराची पहिली झलक, पाहा VIDEO

Bigg Boss 19 Home Tour : सलमान खानचा शो 'बिग बॉस 19' प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहे. 'बिग बॉस'च्या घराची पहिली झलक समोर आली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' शो 24 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

'बिग बॉस'च्या घराची पहिली झलक समोर आली आहे.

'बिग बॉस 19'मध्ये तगडे कलाकार झळकणार आहेत.

'बिग बॉस 19' (Bigg Boss 19 ) सुरू होण्यासाठी आता काही तास उरले आहेत. स्पर्धकांसाठी 'बिग बॉस 19'चे घर सज्ज झाले आहे. नुकतीच 'बिग बॉस 19'च्या घराची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. येथील सौंदर्य आणि भव्यता पाहून तुमचे डोळे चक्रावतील. 'बिग बॉस 19'चे होस्टिंग बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणार आहे. 'बिग बॉस 19' च्या आलिशान आणि स्टायलिश घराचा व्हिडीओ समोर आला आहे.

'बिग बॉस 19'ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घर खूपच रंगीबेरंगी दिसत आहे. डोळ्यांना भावणाऱ्या रंगाचा येथे वापर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "इंतेजार खतम...बिग बॉस हाऊस है तयार, अब देखना है की, क्या खूब चलेगी यहाँ घरवालों की सरकार..." सध्या 'बिग बॉस 19'च्या घराची झलक पाहून चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

कसं आहे 'बिग बॉस 19'चं घर?

व्हिडीओमध्ये तुम्हीला किचन, लॉन, लिव्हिंग एरिया पाहायला मिळत आहेत. तसेच स्टायलिश बेडरूम, जिम, स्विमिंग पूल आणि वॉश एरिया दिसत आहे. सर्वात जास्त भांडणे ज्या भागात होतात तो किचन एरिया खूप मोठा आणि सुंदर सजवला आहे. संपूर्ण घरात पक्षी-प्राण्यांची सजावट पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस' चे घर खूपच कलरफुल दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या थीम पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस' च्या घराचे इंटिरियर पाहून तुमचेही डोळे दिपतील. येथे सुंदर जिम एरिया देखील पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस 19' कुठे पाहता येणार?

सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो 24 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Local Power Block : मध्य रेल्वेवर ४ दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक, नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर फटका, वाचा कोणकोणत्या ट्रेन रद्द

Fact Check: AI साडी ट्रेंड शरीराचे फोटो चोरतोय? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Breakfast Recipe : पालकाची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा नाश्त्याचा 'हा' चटपटीत पदार्थ

SCROLL FOR NEXT