Pranit More Struggle Journey SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

Bigg Boss 19-Pranit More Struggle Journey : मराठमोळ्या प्रणित मोरेचा 'टॉप 3' मध्ये येऊन 'बिग बॉस 19'च्या घरातील प्रवास संपला. प्रणित मोरेच्या करिअरचा संघर्षमय प्रवास, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रणित मोरेला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखले जाते.

प्रणित मोरे एक स्टँडअप कॉमेडीयन आहे.

प्रणित मोरेचा दादरची चाळी ते बिग बॉसचे घर हा प्रवास खूप संघर्षमय होता.

'बिग बॉस 19' च्या घरातून प्रणित मोरेचा प्रवास थांबला आहे. प्रणित मोरे 'टॉप 3'मध्ये येतो. मात्र त्याला कमी मतांमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले. 'बिग बॉस 19'च्या संपूर्ण प्रवासात प्रणित मोरे खूप छान खेळला. प्रेक्षकांनी, अवघ्या महाराष्ट्राने त्याला खूप पाठिंबा दिला. बिग बॉसच्या घरात असताना प्रणित मोरेला डेंगू देखील झाला होता. मात्र तो बरा होऊन पुन्हा खेळात उतरला.

महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरेने तीन महिन्यात 'बिग बॉस १९' चे घर गाजवले आहे. प्रणित मोरेची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रणित मोरे स्टँडअप कॉमेडी, युट्यूबर, कंटेंट क्रिएशन करतो. प्रणित मोरेला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखले जाते. त्याचा संघर्षमय प्रवास जाणून घेऊयात.

प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास

प्रणित मोरे सुरुवातीला मुंबईतल्या दादरमधील एका चाळीत राहायचा. त्याचे वडील बेस्टमध्ये कंडक्टर होते. वडीलांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना जॉब सोडवा लागला. आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे प्रणितचे कुटुंब नवी मुंबईला शिफ्ट झाले. वडीलांचे 2004 मध्ये व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यामुळे घर आणि दुकान विकले.

प्रणितला 2013 ला कार शोरुममध्ये जॉब लागला. 2017 ला त्याने स्टँडअप कॉमेडीला सुरुवात केली. तो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. मात्र 2018 ला त्याच्या आजीचं निधन झालं. त्यानंतर प्रणितने MBA केले. 2019 मध्ये आर.जे चा जॉब मिळाला. चार वर्ष काम केले. 2022 ला प्रणितला जॉबवरून काढण्यात आले.

मग प्रणित पुन्हा 2022 मध्ये स्टँडअप कॉमेडीकडे वळला आणि त्याला यश आले. त्यानंतर 2023-2024 मध्ये त्याने इंडिया टूर केले. जानेवारी 2025 मध्ये एका कलाकारावर केलेल्या विनोदामुळे प्रणितवर हल्ला झाला. तो त्याच्या आयुष्यातील किंवा करिअरमधील कठीण काळ होता. मात्र त्यातून सावरत त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. जुलै 2025 मध्ये त्याने स्वतःचं घर घेतले. तसेच ऑगस्ट 2025 महिन्यात त्याला 'बिग बॉस 19'कॉल आला. 2004 मध्ये प्रणितची आई टिफिनचा व्यवसाय करायची. तेव्हा तो आईला मदत म्हणून घरोघरी जाऊन टिफिन द्यायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उठता - बसता हाडांचा कटकट आवाज येतो? तिशीतच गुडघेदुखीनं त्रस्त; किचनमधील खा 'हा' पदार्थ, व्हाल फिट

Heart Attack: ही 4 ‘साइलेंट’ लक्षणं दिसली तर तत्काळ सावध व्हा; हार्ट अटॅकची सुरूवात असू शकते

Beed Crime: प्रवाशांनो सावधान! बीड ते तुळजापूर दरम्यान १० धोकादायक ठिकाणे, महामार्गावर होतेय जबरी चोरी अन् लुटमार

चौकशीपासून वाचण्यासाठी धनंजय मुंडेंनी अजितदादांचे पाय पकडले; माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, जरांगेंचे गंभीर आरोप|VIDEO

Maharashtra Live News Update: वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचारिकेला केली लैंगिक सुखाची मागणी

SCROLL FOR NEXT