Elphiston Bridge : दादर-CSMT दरम्यान १७ तासांचा जम्बोब्लॉक; १२५० लोकल, ४० एक्सप्रेसचा खोळंबा होणार, पण कधी? जाणून घ्या

Elphistone Bridge Work Update: एलफिस्टन ब्रिज पाडकामाला सुरुवात झाली आहे. आता एलफिस्टन ब्रिज पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर १७ तासांचा ब्लॉक घेणे आवश्यक आहे.
Elphiston Bridge
Elphiston BridgeSaam Tv
Published On
Summary

एलफिस्टन पुड पाडकामाला सुरुवात

पूल पाडण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १७ तासांचा ब्लॉक आवश्यक

ब्लॉक घेण्यासाठी मध्य रेल्वेची दमछाक

एलफिस्टन ब्रिड पाडण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, हा पूल पाडण्यासाठी पाडण्यासाठी आवश्यक रेल्वे ब्लॉकचे नियोजन करताना मध्य रेल्वेची दमछाक होताना दिसत आहे. यामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये मीटिंग सुरु आहे. याबाबत अद्याप सर्व प्लान तयार झालेला नाही. डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा ब्लॉक घेतला जाण्याची शक्यता आहे. (Elphistone Bridge Demolition Work Update)

Elphiston Bridge
Mega Block News : महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवेर ४ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक,लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यावरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण वेळापत्रक

१७ तासांचा ब्लॉक आवश्यक (Mumbai Local 17 Hours Block)

महारेलकडून पुलाच्या पाडकामासाठी १४ तासांचा ब्लॉक मागितला आहे.रेल्वेला ओव्हरहेड वायरच्या कामासाठी सुमारे १ तास हवा आहे. त्यामुळे १७ ब्लॉक ठेवण्यास सांगितले आहे. मात्र, या कालावधीत दादर - सीएसएमटी मार्ग बंद केल्यास रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे १५ तासांचा ब्लॉक कसा घ्यायचा असा प्रश्न आता मध्य रेल्वेला पडला आहे.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेणे गरजेचे

रेल्वे भागातील १३२ मीटर पुलाचा भाग मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रेल्वे रुळांवरून जातो. दोन्ही भागातले पाडकाम मात्र स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागातील पाडकाम करण्यात येणार आहे. यासाठी यासाठी ब्लॉकचे नियोजन सुरू आहे. ब्लॉक कधी घ्यायचा, ब्लॉक कसा असणार याबाबत नियोजन सुरु आहे.

Elphiston Bridge
Mumbai Metro : २ तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत, 'ही' मेट्रो मुंबईकरांचा वेळ वाचवणार

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर दरम्यान चारही मार्गिका बंद केल्यास सुमारे ४० मेल/एक्सप्रेस आणि १२५० लोकल सेवांवर परिणाम होईल.बाहेरगावाहून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर (एलटीटी) मध्ये सामावण्याची क्षमता नाही. त्यामुळे मध्य रेल्वेला हा ब्लॉक कसा ठेवायचा असा प्रश्न पडलेला आहे. या ब्रिजमधील ओव्हरहेड वायर आणि गर्डरमधील अंतर खूप कमी आहे. त्यामुळे ते पाडण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. यासाठीच मध्य रेल्वेवरचा हा ब्लॉक महत्त्वाचा आहे.

Elphiston Bridge
Mumbai Railway: मुंबईतील रेल्वे स्थानकांचा कायापालट, २० नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार; रेल्वेची ब्लू प्रिंट कशी आहे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com