Thane Traffic: ठाणेकरांची वाहतूक कोंडी फुटणार! कोपरी पुल प्रवासासाठी खुला

Thane- Kopri Bridge Now Open For Thanekar: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता कोपरी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलावरचे तुळई बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
Thane Traffic
Thane TrafficSaam tv
Published On

ठाण्यातील कोपरी परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते. प्रवासी जवळपास अर्धा अर्धा तास एकाच जागेवर उभे असतात. दरम्यान, आता कोपरीतील वाहतूक कोंडी फुटणार आहे. ठाणे पूर्व सॅटीस २ प्रकल्पाअंतर्गत कोपरी रेल्वे उड्डाणपूल येथे तुळई बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

Thane Traffic
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

मध्ये रेल्वेवर आठ दिवसांत १४ तासांचा विशेष ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले आहे. ब्लॉक असलेल्या कालावधीत मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना तुळई बसवण्यात आल्या आहेत. याचे उर्वरित काम हे सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र, हे कामासाठी कोपरी पूल (Thane Kopri Bridge) बंद ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी या प्रकल्पाअंतर्गत सॅटीस २ प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. यासाठी गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी कोपरी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ही वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली होती. परंतु आता तुळई बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

यामुळे कोपरी पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळेच ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. रेल्वे मार्गावरील काम पूर्ण झाले आहे त्यामुळे इतर उरलेले काम पूल सुरु असतानाही पूर्ण करता येईल. हे काम ४ ऑगस्ट म्हणजे सोमवारपर्यंत पूर्ण होईल.

Thane Traffic
Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार २० डब्यांचा रेक; २९ ऑगस्टपासून बदल लागू | VIDEO

१४ तासांचा विशेष ब्लॉक घेत काम पूर्ण

२६ जुलै रोजी दुपारी दोन वाजता तुळई बसवण्याचे काम सुरु झाले. यासाठी कोपरी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. ती इतर मार्गावर वळवण्यात आली. या काळात दोन्ही मार्गावर १०० टन वजनाच्या तुळच्या बसवण्यात आल्या. २७ जुलै रोजी अजून एक तुळई बसवण्यात आली. २९ जुलै रोजी दोन तुळ्या बसवण्यात आल्या. ही मोहिम ३० जुलै रोजी पूर्ण झाली.

Thane Traffic
Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com