Bigg Boss 19 Winner Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 Winner: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 19'चा धमाकेदार ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बिग बॉस 19 चा विनर मिळाला असून या शोची ट्रॉफी गौरव खन्नाने आपल्या नावावर केली आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 19 Winner: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 19'चा धमाकेदार ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. होस्ट सलमान खानने बिग बॉस 19च्या विनरची घोषणा केली. बिग बॉस 19ला विनर मिळाला असून या शोची ट्रॉफी गौरव खन्नाने आपल्या नावावर केली आहे. तर, फरहाना भट्ट या शोची उपविजेती ठरली आहे. बिग बॉस 19 ला गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणित मोरे, फरहाना भट्ट आणि अमाल मलिक हे पाच फायनलिस्ट मिळाले होते.

बिग बॉस 19 च्या प्रेक्षकांनी या पाच सदस्यांना खूप चांगली पसंती दिली. पण बिग बॉस विनरच्या शर्यतीमधून सुरूवातीला अमाल मलिक बाहेर पडला. अमालच्या पाठोपाठ तान्या मित्तल, प्रणित मोरे देखील या शर्यतीतून बाहेर पडले. गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट यांच्यामध्ये बिग बॉस 19 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी अटीतटीची लढत झाली. अखेर गौरव खन्नाने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली.

बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले खूपच रंगतदार झाला. यावेळी बिग बॉसच्या घरातील पाचही फानलिस्टने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिले. बिग बॉस 19 च्या पाचही फानलिस्टच्या चाहत्यांना त्यांना आवडत असलेल्या स्पर्धकाने या शोची ट्रॉफी जिंकावी असे वाटत होते.

विनरची ट्रॉफी जिंकण्यासाठी गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट हे आमने-सामने आले. शेवटी या शोची टॉफी गौरव खन्नाने जिंकली. या शोच्या ट्रॉफी सोबत गौरव खन्नाला 50 लाख रुपयांचा चेक आणि बिग बॉस १९ ची ट्रॉफी बक्षीस स्वरुपात मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT