Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19'ची धमाकेदार सुरूवात; पहिल्याच दिवशी सदस्यांनी घातला तुफान राडा, पाहा VIDEO

Bigg Boss 19 First Promo : 'बिग बॉस 19'चा पहिला प्रोमो समोर आला आहे. ज्यात पहिल्याच दिवशी घरातील सदस्य भांडताना दिसत आहे. घरात नेमकं चालू काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो सुरू झाला आहे.

पहिल्याच दिवशी सदस्यांचे घरात भांडण झाले आहे.

बिग बॉसने सदस्यांमध्ये फूट पाडायला सुरूवात केली आहे.

सलमान खानचा 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) शो सुरू झाला असून पहिल्याच दिवशी घरातील सदस्य भांडताना दिसत आहेत. 'बिग बॉस 19'मध्ये 16 सदस्य आहेत. बिग बॉसने सदस्यांमध्ये फूट पाडायला सुरूवात केली आहे. नुकताच 'बिग बॉस 19' चा पहिला प्रोमो समोर आला आहे. ज्यात सदस्य भांडताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी राडा झाला आहे. घरात 16 सदस्य असून बेड मात्र 15 आहेत. त्यामुळे घरात चांगलीच वाद पाहायला मिळत आहे.

बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, बिग बॉस म्हणतात की, "या सीझनचा पहिला निर्णय...सदस्य 16 आणि बेड 15... घरात असा एक सदस्य असेल जो, बिग बॉसचा हाऊसमेट होण्यास पात्र नाही कारण त्याचे व्यक्तिमत्व सर्वात कमी मनोरंजक आहे..." त्या व्यक्तीचे नाव ठरवण्याचा अधिकार बिग बॉस घरातील सदस्यांना देतो. ज्यामुळे घरात सदस्यांमध्ये पहिल्याच दिवशी मोठे भांडण होते. बिग बॉसने पहिल्या दिवसांपासून सदस्यांमध्ये फूट पाडायला सुरूवात केली आहे. कुनिका सदानंद, बसीर अली पहिल्याच दिवशी घरात दादागिरी करताना दिसले.

'बिग बॉस 19' सदस्यांची यादी

  1. गौरव खन्ना

  2. अभिषेक बजाज

  3. प्रणित मोरे

  4. अवेज दरबाज

  5. जीशान कादरी

  6. मृदूल तिवारी

  7. नतालिया जानोस्झेक

  8. नेहल चुडासमा

  9. अमाल मलिक

  10. फरहाना भट्ट

  11. कुनिका सदानंद

  12. नगमा मिराजकर

  13. नीलम गिरी

  14. बसीर अली

  15. अशनूर कौर

  16. तानिया मित्तल

'बिग बॉस 19' कुठे पाहता येणार?

सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो आता सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

Local Body Election: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटणार, किती टप्प्यात होणार निवडणूक?

Diabetes Paitent: मधुमेह रूग्णांनी हे ५ पदार्थ कधीही खाऊ नयेत, रक्तातील साखर वाढते

SCROLL FOR NEXT