Tanya Mittal Ex Boyfriend Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tanya Mittal Ex Boyfriend Arrested: 'बिग बॉस १९' फेम तान्या मित्तलच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Bigg Boss 19 Tanya Mittal Ex Boyfriend Arrested : तान्या मित्तलचा एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंग याला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केल्याची बातमी आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 19 fame Tanya Mittal Ex Boyfriend Arrested :  रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ फेम तान्या मित्तल सतत चर्चेत असते. कधी तिच्या बिग बॉसमध्ये काहीही बरळण्यामुळे तर, कधी सोशल मीडियावरील तिच्या रिल्स आणि पोस्टमुळे. आता पुन्हा एकदा तान्या चर्चेत आली असून यावेळी निमित्त तिचा एक्स बॉयफ्रेंड आहे. सोशल मीडियावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केल्याची चर्चा रंगू लागली.

तान्या मित्तलने यापूर्वी मुलाखतींमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडफार सांगितलं होतं. ती म्हणाली होती, “माझा एक्स मोठ्या घराण्यातून आहे, त्याचा राजकारणाशी संबंध आहे,” यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले. अलीकडेच काही पोर्टल्सवर तिच्या एक्सबाबत “अटक झाली” असा दावा करणाऱ्या बातम्या झळकल्या.

टेली मसालाच्या वृत्तानुसार तान्या मित्तलचा एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंहला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. मात्र, इतर विश्वसनीय माध्यमांनी अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. तान्याच्या एक्सवर गुन्हा दाखल झाला आहे किंवा तो खरोखरच तुरुंगात आहे, हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ही चर्चा अफवा असल्याची शक्यता मानली जात आहे.

तान्या मित्तल सध्या बिग बॉसच्या घरात आपला खेळामुळे आणि तिच्या वागण्या-बोलण्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. कधी तिच्या फॅशनबद्दल चर्चा रंगते, तर कधी तिच्या वक्तव्यांवरून तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. यावेळी मात्र तिच्या माजी प्रियकराबाबतच्या वादग्रस्त बातमीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: देशभक्तीचा व्यापार सुरू आहे – उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये कार चालकाची मुजोरी; धडक देत महिलेलाच दमदाटी

वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं

Maratha Reservation: १० टक्के की OBC, मराठा समाजाला कोणतं आरक्षण देणार? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

Shocking News: लिफ्टच्या दारात केस अडकले अन् डोकं चिरडलं, ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT