Kunickaa-Kumar Sanu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kunickaa-Kumar Sanu: 'त्यांच नातं टॉक्सिक...'; कुनिका सदानंद आणि कुमार सानूच्या अफेअरवर मुलगा अयान लाल स्पष्टचं म्हणाला

Kunickaa Sadanad-Kumar Sanu Affair: कुमार सानू आणि त्यांची पहिली पत्नी रीता भट्टाचार्य यांचे नाते खूप वाईटरित्या संपले आणि त्यानंतर कुनिका सदानंदने कुमारच्या आयुष्यात प्रवेश केला.

Shruti Vilas Kadam

Kumar Sanu News: बिग बॉस स्पर्धक कुनिका सचदेवमुळे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू सध्या चर्चेत आहे . कुनिका पूर्वी गायक कुमार सानू सोबत रिलेशनशिपमध्ये होती. शो सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी कुनिकाने कुमार सानूसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले होते आणि आता 'बिग बॉस'च्या घरातही तिने सानूचे नाव न घेता बरेच काही सांगितले आहे. दरम्यान, कुमार सानू आणि त्याच्या पत्नीचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघेही एकमेकांबद्दल बरेच काही बोलत आहेत.

खरं तर, जेव्हा कुमार सानूचे त्याची पहिली पत्नी रीता भट्टाचार्यसोबतचे नाते खराब होत होते, तेव्हा कुनिका त्याच्या आयुष्यात आली. सिद्धार्थ कन्ननशी झालेल्या संभाषणात कुनिकाने दावा केला होता की कुमार त्याचे आयुष्य संपवू इच्छित होता. पण ती त्याच्या आयुष्यात आल्यानंतर तो आनंदी राहू लागला. कुनिकाने असेही सांगितले होते की कुमार सानूची पत्नी रीता भट्टाचार्यने त्याच्या गाडीची तोडफोड केली होती. आता बिग बॉसच्या घरातही कुनिकाने सांगितले की ती कोणासोबत तरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि आता २७ वर्षांनंतर तिने त्या नात्याबद्दल बोलले. कुनिकाने असेही म्हटले की तिच्या जोडीदाराने तिला फसवले आहे.

हे नाते सहा वर्षे टिकले

या शोमध्ये कुनिका सदानंदने उघडपणे कबूल केले की कुमार सानू विवाहित असतानाही तिचे त्याच्याशी प्रेमसंबंध होते. तिने यापूर्वी खुलासा केला होता की कुमार सानू त्यावेळी वेगळे वैवाहिक जीवन जगत होते आणि त्याच्या कुटुंबापासून दूर राहत होते. कुनिका आणि सानूचे नाते सहा वर्षे टिकले. त्यांनी सानूच्या कुटुंबाचा आदर करण्यासाठी ते गुप्त ठेवले. जेव्हा कुनिकाचा मुलगा अयान लाल शोमध्ये आला तेव्हा त्याने या नात्याला 'टॉक्सिक' म्हटले.

आईला अजूनही तो आवडतो - अयान

सिद्धार्थ कन्ननशी मुलाखतीत बोलताना अयानने स्पष्ट केले की त्याची आई कुनिका अजूनही कुमार सानूला गायक म्हणून पसंत करते आणि अनेकदा त्याची गाणी गाते. त्याने खुलासा केला की काही लोकांचा असा विश्वास होता की हे नाते २७ वर्षे टिकले, परंतु असे झालं नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

SCROLL FOR NEXT