Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18' च्या घरात नवा राडा; वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी इतर सदस्यांना दिला इशारा, म्हणाले...

Kashish-Digvijay : बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर आपली घरातील इतर सदस्यांविषयी मते सांगतात. जे ऐकून घरात नक्कीच नवीन राडा पाहायला मिळणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या प्रचंड गाजत आहे. रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात दोन वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या आहेत. या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने चक्क भाईजान म्हणजे सलमन खानला डोक्याला हात लावायला भाग पाडले. बिग बॉसच्या स्टेजवरच दिग्विजय सिंग आणि कशिश कपूर भांडायला लागले होते. आता घरातील सदस्यांचे तोंडचे पाणी पळणार आहे.

बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच दिग्विजय आणि कशिशने आपली घरातील इतर सदस्यांविषयी आपली मते सांगून त्यांना एक इशारा दिला आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिग्विजय आणि कशिश (Kashish Kapoor) घरातील सदस्यांना इशारा देताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये ती दोघ आपली ओळख करून देण्यासोबतच घरातील स्पर्धांवरही टीका-टिपणी करताना पाहायला मिळत आहेत.

दिग्विजय बोलतो की, मला घरातील एकही सदस्य आवडत नाही. तर कशिश अविनाशला उद्धट आणि ईशाला स्वार्थी बोलते. दिग्विजय (Digvijay Singh Rathee ) विवियनला बोलतो की, तू घरातल्यांचा लाडका असशील पण मला जनतेचा लाडका व्हायचा आहे. तर दुसरीकडे कशिश घरातील सर्व सदस्यांना इशारा देत बोलते की, माझ्यासोबत इज्जतीत राहिल तर तुम्हालाही इज्जत मिळेल.

स्प्लिट्सव्हिलामध्ये कशिश कपूर आणि दिग्विजय सिंग हे कपल होते. ते फिनालेपर्यंत पोहचले होते. मात्र कशिशच्या एका निर्णयामुळे त्यांची ट्रॉफी गेली होती. कारण कशिशने ट्रॉफी ऐवजी पैसे उचलले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT