Kagal Vidhan Sabha : मुश्रीफांचा 'दिग्विजय' रोखण्यासाठी 'घाटगे' तुतारी फुंकण्याच्या तयारीत, कागलमध्ये हायव्होल्टेज लढत होणार

Vidhan Sabha Election 2024/Kagal Assembly constituency : महायुतीत असतानाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे शरद पवार गटातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Kagal Vidhan Sabha
Kagal Vidhan SabhaSaam Digital
Published On

कोल्हापूरातील महत्त्वाचा आणि राज्यांचं लक्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कागलं मतदारसंघ. जिल्ह्याच्या राजकारणात मोठं असलेल्या कागल मतदारसंघात वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सध्या विद्यमान आमदार आहेत. मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे महायुतीत असतानाच मुश्रीफांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत मुश्रीफांच्या विरोधात लढलेले समरजितसिंह घाटगे महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाविकास आघाडीतून अंबरिश घाटगे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.त्यामुळे मुश्रीफ विरुद्ध घाटगे अशीच लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

Kagal Vidhan Sabha
Chandgad Vidhan Sabha : महायुतीत बंडखोरीचं वारं, मविआचा सावध पवित्रा? गटातटाच्या राजकारणात कोण राखणार चंदगडची 'पाटीलकी'?

शाहू ग्रुपचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी गेली पाच वर्ष मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क वाढवला असून पाच वेळा निवडून आलेल्या मुश्रीफ यांना रोखण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांना महायुतीतील दगाफटका झाल्याचा आरोप होत असताना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. मुश्रीफ यांच्या या निर्णयाने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत मंडलिक यांना या एका मतदारसंघातून किमान ७० ते ८० हजारांचे मताधिक्य मिळेल असा अंदाज होता, मात्र केवळ १५००० मताधिक्य मिळालं. मंडलिक-मुश्रीफ-राजे गट एकत्र असतानाही मतदानाचा टक्का घसरल्यामुळे दगाफटा कोणी केला याची चर्चा सुरू अजून सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्‍वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत गेली. सध्या विधानसभा निवडणुकांचं वातावरण तापू लागलं असून जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहे, मात्र त्यापूर्वीच मुश्रीफ यांनी लढण्याची घोषणा करून समरजितसिंह घाटगे यांचीच कोंडी केली आहे. महायुतीकडून मुश्रीफ हेच प्रबळ दावेदार आहेत. मात्र जागावाटपाआधी त्यांनी घोषणा केल्याने समरजितसिंह घाटगे यांची कागलच्या राजकारणातील भूमिका महत्त्‍वाची असणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कागलची जागा भाजप-सेना युतीत शिवसेनेकडे होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाली आणि समरजितसिंह यांनी बंडखोरी करून ही निवडणूक लढविली होती. त्यांना या निवडणुकीत ८८००० मतं मिळाली होती. आता शिवसेनेत फूट पडली आहे, मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडे ताकदीचा उमेदवार नाही. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटांकडून या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश घाटगे यांना उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चा आहे. तर समरजितसिंह घाटगे अपक्ष किंवा पवार गटाकडून लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com